बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘राजनाथ सिंह यांचा फोन आला आणि मला म्हणाले अस्सलाम वालेकुम’ -उद्धव ठाकरे

मुंबई | महाराष्ट्रात आता पावासाचे आणि राजकारणाचे मोठे वादळ सुरु आहे. महाविकास आघाडी सरकार (MVA) जाऊन आता शिंदे-भाजप सरकार सत्तेत आलं आहे. अशातच आता देशाच्या राष्ट्रपतींच्या निवडणूका देखील तोंडावर आल्या असल्याने संपुर्ण देशातील लहान-मोठे पक्ष राजकीय खलबतं करत आहेत. अद्याप महाराष्ट्राच्या नवीन मंत्रींमंडळाचा विस्तार झाला नाही. तो राष्ट्रपतींच्या निवडी नंतरच होईल अशी चिन्हे आहेत.

दरम्यान शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी फोन केला होता. त्यात झालेले संभाषण आणि किस्सा ठाकरेंनी सांगितला. दोन दिवसांपुर्वी ठाकरेंनी शिवसेना खासदारांची आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात त्यांनी हा किस्सा सांगितला. या किस्स्यातील एका विधानावरुन आरोप प्रत्यारोप सुरु आहेत.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी उद्धव ठाकरेंना फोन करुन अस्सलाम वालेकुम म्हटले, असे ठाकरे म्हणाले. राजनाथ सिंह यांच्या या नमस्कारावर उद्धव ठाकरे संतापले तेव्हा त्यांनी जर श्री राम म्हणत पुढे संभाषण चालू ठेवले. ठाकरे आणि सिंह यांच्या फोनवरील संभाषणाची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. एनडीएकडून राजनाथ सिंह यांना राष्ट्रपतींच्या निवडणूकीसाठी सम्नवयक म्हणून जबाबदारी दिली आहे.

राजनाथ सिंह यांच्याकडून देशभरातील प्रमुख पक्षांच्या राजकीय नेत्यांशी फोनवरुन सध्या चर्चा सुरु आहे. प्रमुख पक्षांच्या नेत्यांना फोन करुन ते दौपदी मुर्मू यांना पाठींबा देण्याची विनंती करत आहेत. यावेळी राजनाथ सिंह यांनी उद्धव ठाकरेंना फोन केला होता. यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तर राजनाथ सिंह यांना मेहबुबा मुफ्ती यांना फोन लावायचा असेल, परंतु चुकीने त्यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंना फोन लावला, असा टोला संजय राऊतांनी लगावला.

थोडक्यात बातम्या –

संभाजीराजे छत्रपतींचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र, म्हणाले…

ईडी ना काडी, ‘या’ कारणामुळे शितल म्हात्रे शिंदे गटात सामील

सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, सीएनजी आणि पीएनजी ‘इतक्या’ रूपयांनी महागलं

‘…त्यामुळे औरंगाबादचं नाव बदलू देणार नाही’, इम्तियाज जलील आक्रमक

नवीन संसद भवनाच्या राष्ट्रचिन्हावरुन वाद, ‘या’ कारणामुळे विरोधक आक्रमक

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More