बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मोदी पंतप्रधान असल्यापासून देशात एकही दहशतवादी हल्ला झाला नाही, हे खूप मोठं यश”

नवी दिल्ली |  अफगाणिस्तानमधून अमेरिकेने सैन्य काढून घेतल्यानंतर तालिबानने हवेत गोळीबार करत आंनद साजरा केला आहे. त्यानंतर तालिबानच्या या विजयानंतर दहशतवादी संघटनांना बळ मिळल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे भारतातही त्याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. अशातच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संदर्भात महत्वाचं वक्तव्य केलं आहे.

नरेंद्र मोदी 2014 साली देशाचे पंतप्रधान असल्यापासून भारतात एकही दहशतवादी हल्ला झाला नाही आहे. केंद्रात भाजप सरकार आल्यापासून दहशतवादी ही घाबरले असल्याचं राजनाथ सिंह म्हणाले. नर्मदा जिल्ह्यातील केवाडीया येथे पार पडलेल्या बैठकीत ते बोलत होते.

भारतात आम्ही दहशतवाद्यांना थारा दिला नाही. काश्मीर विषय तर काही बोलूच नका. देशात भाजपची सत्ता आल्यापासून एकही दहशतवादी हल्ला झाला नाही आहे. हे आमचं मोठं यश म्हणाव लागेल.  उरी हल्ल्यानंतर आम्ही सर्जिकल स्ट्राईक करत दहशतवाद्यांना जोरदार उत्तर देऊन जगाला ठणकावून सांगितलं आहे की आमच्या देशात दहशतवाद्यांची काही खैर नाही, असंही राजनाथ सिंह यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, भाजप आणि काॅंग्रेस सरकारमध्ये फरक स्पष्ट दिसत आहेत. काॅंग्रेस पक्ष राजकारणात महात्मा गांधी यांच्या नावाचा वापर करत आहे. परंतु त्यांनी दाखवून दिलेल्या मार्गावर ते चालत नाहीत, असा आरोप ही राजनाथ सिंह यांनी काॅंग्रेस पक्षावर केला आहे.

 

थोडक्यात बातम्या-

‘…अन् बॉडीबिल्डरचा फुटला बायसेप’; इंजेक्शन घेऊन बायसेप्स फुगवणाऱ्यांनो वेळीच व्हा सावध, पाहा व्हिडीओ

कोरोना अपडेट! मुंबईची आकडेवारीत कमी आधिक प्रमाणात घट, वाचा आजची आकडेवारी!

“वडेट्टीवार हा जातीयवादी माणूस”; विनायक मेटेंना वडेट्टीवारांचं प्रत्युत्तर, म्हणाले…

तालिबान्यांना जूगारून अफगाणिस्ताच्या रणरागिणी उतरल्या मैदानात, केल्या ‘या’ महत्वाच्या मागण्या!

अखेर तालिबानचं ठरलं! नव्या सरकारमध्ये तालिबान्यांनी केली ‘या’ नेत्याची निवड

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More