बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीचं बिगुल वाजलं; ‘या’ तारखेला होणार मतदान

नांदेड | काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचं काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे निधन झाले होते. ते नांदेड जिल्ह्यातील देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. त्यांच्या निधनानंतर देगलूर-बिलोली मतदारसंघाची जागा सध्या रिक्त आहे. या रिक्त जागेच्या पोटनिवडणुकीसाठी तारखा जाहीर झाल्या करण्यात आल्या आहेत.

देगलूरमध्ये सध्या विधानसभा पोटनिवडणुकांची रणधुमाळी पहायला मिळत आहे. या निवडणुकीच्या अनुषंगानं राजकीय पक्षांनी पावलं टाकायला सुरुवात केली आहे. त्यातच आता देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. येत्या 30 ऑक्टोबरला ही पोटनिवडणूक होणार आहे. तर 3 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

काही दिवसांपूर्वीच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नांदेडचा दौरा करत भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्यामुळे काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी ही निवडणूकीसाठी चढाओढ लागली आहे.

दरम्यान, काँग्रेस नेते रावसाहेब अंतापूरकर यांची रिक्त जागा कोण भरणार याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे. याच कारणामुळे सध्या येथील राजकारण तापलं आहे. या निवडणुकीत भाजप बाजी मारतंय का काॅंग्रेस हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या – 

हातातोंडाशी आलेला घास पावसाने नेला! मुसळधार पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान; पाहा व्हिडीओ

तळीरामांचे वांदे! लस घेतली तरचं मिळणार दारू; ‘या’ जिल्ह्यात राबवली भन्नाट कल्पना

“संजय राऊतांनी ईडीला तब्बल 55 लाख रूपये दिले, अडसूळांनी राऊतांकडून काहीतरी शिकावं”

RSSवर टीका केल्याने जावेद अख्तर यांच्या अडचणीत वाढ; न्यायलयाने पाठवली नोटीस

“तुमचं आमचं स्वप्न पुर्ण करायचंय, 2024 ला राष्ट्रवादीचा झेंडा फडकेल”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More