बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

उत्सुकता शिगेला! देगलूर-बिलोली पोटनिवडणुकीची उद्या मतमोजणी

नांदेड | काँग्रेस आमदार रावसाहेब अंंतापूरकर यांचं कोरोनाने निधन झाल्याने देगलूर-बिलोली येथे पोटनिवडणूक होत आहे. काँग्रेसकडून रावसाहेब अंतापुरकर यांचे सुपुत्र जितेश अंतापुरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपकडून शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांना उमेदवारी देण्यात दिली गेली आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीने डॉ. उत्तम इंगोले यांना रिंगणात उतरवले आहे.

30 ऑक्टोबर रोजी तीन लाख मतदारांपैकी 63.94 टक्के मतदान झाले. या निवडणुकीत भाजपने ही तगडी प्रचार यंत्रणा उभारुन निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण केली. 2009 विधानसभा मतदारसंघाची पुर्नरचना झाल्यानंतर रावसाहेब अंंतापूरकर यांनी सुभाष साबणे यांना पराभुत केलं. त्यानंतर 2014 मध्ये शिवसेना आणि भाजप वेगवेगळे लढले होते. यावेळी सुभाष साबणे यांनी रावसाहेब अंंतापूरकर यांचा पराभव केला होता.

त्यानंतर 2019 ला भाजप आणि शिवसेनेची युती झाली. शिवसेना आणि भाजप एकत्र लढले. यावेळेस रावसाहेब अंंतापूरकर यांनी सुभाष साबणे यांना चितपट केलं होतं. 2019 मध्ये रावसाहेब अंतापुरकर यांना 89,407 इतकी मते मिळाली होती तर  सुभाष साबणे यांना 66,974 इतकी मते मिळाली होती.

दरम्यान, देगलुर-बिलोली पोटनिवडणुकीच्या प्रचारात अनेक नेत्यांनी एकमेकांंवर आरोप-प्रत्यारोप केले आहेत. राज्याचे सार्वजानिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. उद्या म्हणजेच 2 नोव्हेंबरला देगलूर-बिलोली पोटनिवडणुकीचा निकाल जाहिर होणार आहे.त्यामुळे कोण विजयी होणार? याची  उत्सुकता शिगेला लागली आहे.

 थोडक्यात बातम्या- 

“यंदा दिवाळीला भाऊबीज म्हणून गॅस सिलेंडर मागणार”

“नवाब मलिक म्हणजे बिघडे नवाब, माझ्या अंगावर कोणी आलं तर…”

याला म्हणतात झटपट निकाल! कुत्र्याला त्रास देणाऱ्याला गाईने घेतले शिंगावर; पाहा व्हिडीओ

“2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले नसते तर…”

केंद्र सरकारची दिवाळी! जीएसटी संकलनात तब्बल ‘इतक्या’ कोटींची वाढ

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More