Top News

पावसामुळे अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानातील छताचा भाग कोसळला

नवी दिल्ली | दिल्लीत झालेल्या मुसळधार पावसामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानातील छताचा भाग कोसळला. केजरीवाल यांच्या निवासस्थानात असलेल्या एका खोलीचं छत कोसळलंय. या खोलीत अरविंद केजरीवाल यांनी गेल्या काही महिन्यांपासून अनेक बैठका घेतल्या होत्या.

छत कोसळून झालेल्या दुर्घटनेत कुणालाही दुखापत झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, ज्या वेळी छत कोसळण्याची दुर्घटना घडली त्यावेळी केजरीवाल यांच्या घरातील कोणीही त्या खोलीत नव्हतं. खोलीचा हा भाग सतत होणाऱ्या मुसळधार पावसामुळे कोसळला.

छत कोसळण्याची दुर्घटना समजताच दिल्लीतील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी केजरीवाल यांच्या निवासस्थानाला भेट दिली. या संबंधीचा अहवाल लवकरच सादर केला जाणार असल्याची माहिती आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल 2015 मध्ये या घरी राहण्यास आले होते. हे या निवासस्थानात राहण्याआधी अरविंद केजरीवाल हे एका थ्री बीएचके फ्लॅटमध्ये वास्तव्य करत होते.

महत्वाच्या बातम्या-

आनंदाची बातमी! “कोरोनाच्या लसीच्या चाचण्यांना शंभर टक्के यश”

संशोधकांना मोठं यश; कोरोना संसर्गाचे ‘हे’ सहा प्रकार आणले समोर

कोरोनाच्या औषधाचा दावा अंगलट; न्यायालयाने ‘पतंजली’ला ठोठावला इतक्या लाखांचा दंड

राज्यातील शाळा ‘या’ अ‌ॅपवर भरणार, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

मोदी सरकारचा मोठा निर्णय; जम्मू काश्मीरच्या माजी राज्यपालांवर सोपवली मोठी जबाबदारी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या