खेळ

आयच्या गावात! क्रिकेटच्या मैदानात सापाचा नागिन डान्स; पाहा व्हीडिओ

मुंबई | क्रिकेटचा सामना अनेकदा कमी किंवा धूसर प्रकाशामुळं थांबवला जातो. नाहीतर अचानक आलेल्या  पावसामुळं सामना रद्द केला जातो किंवा लांबवला जातो. मात्र रणजी स्पर्धेतील आजच्या विदर्भ विरुद्ध आंध्रप्रदेश सामन्यात एका सापानं सामना लांबवला आहे.

आजपासून रणजी ट्रॉफीच्या  2019-20  नव्या मोसमाला सुरूवात झाली आहे. विदर्भाने या सामन्यातील नाणेफेक जिंकली. प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. सर्व पंच आणि खेळाडू मैदानात आले. मात्र सामन्याचा पहिल्या चेंडू टाकण्याअगोदरच सापानं मैदानात एन्ट्री केली.

ग्राउंड स्टाफ आणि खेळाडूंनी सापाला बाहेर केलं. काही खेळाडू हा व्हीडिओ आपल्या मोबाईलमध्ये चित्रीत करत होते. व्हीडिओ बीसीसीआयच्या ट्वीटर अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे.

रणजी ट्रॉफीचा 86 वा हंगाम आहे. या हंगामात गतविजेत्या विदर्भ संघाचा पहिला सामना आंध्रप्रदेश विरुद्ध विदर्भ हा सामना विजयवाडा येथे होत आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या- 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या