बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राष्ट्राध्यक्षांचं ट्वीट डिलीट करणं ट्विटरला पडलं महागात; झाली ‘ही’ कारवाई

नवी दिल्ली | भारतामध्ये सध्या नवीन आयटी नियमांच्या अंमलबजावणीवरून सरकार विरुद्ध सोशल मीडिया कंपन्या असा वाद सुरू असतानाच नायजेरियामध्ये राष्ट्राध्यक्षांचे ट्वीट डिलीट केल्यामुळे ट्विटर ही मायक्रोब्लॉगिंग कंपनी चांगलीच अडचणीत आल्याचे पाहायला मिळत आहे.

आज ट्विटरबद्दल अनेक बातम्या माध्यमांमध्ये प्रकाशित होत आहेत. भारतामध्ये उपराष्ट्रपती यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटचं ब्लू टिक हटवल्याप्रकरणी तसेच इतरही काही संघटनांच्या महत्त्वाच्या व्यक्तींची ब्लू टिक हटवल्याने वाद पेटला होता. त्यानंतर ट्विटरने माघार घेत त्या अकाउंटचे ब्लू टिक पूर्ववत केले.

नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मदू बुहारी यांचं ट्विट ट्विटरने डिलीट केल्यामुळे नायजेरियामध्ये अमर्यादित काळासाठी ट्विटरवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ट्विटरने थेट देशातील एका महत्त्वाच्या व्यक्तीचे ट्वीट आपल्या साईटवरून काढून टाकल्याने ही कारवाई करण्यात आल्याचं समजतंय. त्यामुळे सध्या नायजेरिया या देशात ट्वीटरवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

ट्विटर या संदर्भात नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, भारत सरकार विरुद्धही ट्विटरने सुरुवातीला आडमुठी भूमिका घेतली होती. त्यानंतर भारत सरकारने खडसावून सांगितल्यानंतर ट्विटरने आपली भूमिका बदलली. त्यानंतर आता नायजेरियामध्ये ट्विटरवर बंदी आल्याने नायजेरियात भारतीय सोशल मीडिया कंपनी कु ही पुढे सरसावत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे जर ट्विटरवर कायमस्वरूपी बंदी नायजेरियात घालण्यात आली तर भारतीय कंपनी कु ही नक्कीच पुढे येईल.

थोडक्यात बातम्या –

कोरोना झालेल्या महिलेच्या हृदयातून काढली चक्क 7 सेंटीमीटरची गाठ

सकारात्मक बातमी! शनिवारी देशात गेल्या काही दिवसांतील सर्वात कमी नव्या कोरोनाबाधितांची नोंद

‘या’ अभिनेत्रीचा क्रिकेट खेळतानाचा मजेशीर अंदाज होतोय व्हायरल; पाहा व्हिडीओ 

हळद ते मिरवणुकीपर्यंत तरुणाच्या डान्सने घातला धुमाकूळ, पाहा व्हिडीओ

“मराठा समाजाला आरक्षण देऊन अशोक चव्हाण यांचा राजीनामा 5 जुलैपर्यंत घ्या, नाहीतर…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More