बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिल्लीत दारू पिण्यासाठीची वयोमर्यादा घटवली; दिल्ली सरकारची नव्या उत्पादन शुल्क धोरणाची घोषणा

नवी दिल्ली | दिल्ली सरकारने नव्या उत्पादन शुल्क धोरणाची घोषणा केली आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी या बद्दल माध्यमांशी बोलताना माहिती दिली आहे. दिल्लीमध्ये यापूर्वी कायदेशीर दारू पिण्याचं वय हे 25 वर्ष होतं. आता नव्या धोरणानुसार ते वय 21 वर्ष करण्यात आलं आहे.

अल्पवयीन मद्यपानाविरुद्ध मोहीम राबवत असतानाच सरकारने आता दारू पिण्याचं कायदेशिर वय 25 वर्षांवरून 21 वर्ष केलं आहे. तसेच 21 वर्षांखालील अल्पवयीन मुलांना दारू देण्यात येऊ नये, याची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येण्याचे आदेश देण्यात आले आहेत आणि दारू विक्री करताना ओळखपत्र तपासण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

नवीन उत्पादन शुल्क धोरण लागू करताना महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यानुसार, दिल्लीमध्ये आता दारूची कंत्राटं सरकार चालवणार नाही. त्याचबरोबर कोणत्याही नवीन दारूच्या दुकानांना सरकारतर्फे मान्यता देण्यात येणार नाही. उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशानंतर दिल्लीतही आता दारू पिण्यासाठी कायदेशीर वय 21 करण्यात आलं आहे.

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी दारूच्या दुकानांसाठी नवीन नियम लागू करणार असून दारूची तस्करी ही मोठ्या प्रमाणात होत असल्याने ती रोखण्यासाठी ही सरकार प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं आहे. सिसोदिया यांनी दिल्लीमध्ये प्रथम आंतरराष्ट्रीय दर्जाची तपासणी प्रयोगशाळा बनावट दारू रोखण्यासाठी करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं आहे.

थोडक्यात बातम्या –

‘लेटरबाॅम्ब’ प्रकरणाला वेगळं वळण; “IPS रश्मी शुक्ला यांना देशमुखांच्या भ्रष्टाचाराची माहिती होती”- परमबीर सिंह

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर; कंगणा रनौतचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्काराने सन्मान

जाणुन घ्या… पुण्यातील कोरोनाबाधितांची आजची धक्कादायक आकडेवारी!

महाराष्ट्रातील लाॅकडाऊनचा येत्या 2 दिवसात निर्णय होणार; राजेश टोपेंचं मोठं स्पष्टीकरण!

“काँग्रेसचा चप्पल उचल्या प्रवक्ता सचिन सावंत जनतेतून कधी आमदार होऊ शकत नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More