बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पृथ्वीच्या वादळाने कोलकाता नेस्तनाबूत, सलग सहा चौकार मारत शॉने रचला इतिहास, पाहा व्हिडीओ

मुंबई | आयपीएलच्या 25व्या दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाई रायडर्सच्या सामन्यात दिल्लीने विजय मिळवला आहे. दिल्लीचा सलामीवीर पृथ्वी शॉने केलेल्या धमाकेदार खेळीच्या जोरावर दिल्लीने सामना 7 विकेट्सने जिंकला आहे. पृथ्वीने कोलकाताच्या मावीच्या पहिल्याच षटकाच सलग 6 चौकार ठोकण्याचा विक्रम केला आहे. सोबतच यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक करण्याचा देखील विक्रम केला.

पृथ्वीने अवघ्या 18 चेंडूत आपलं अर्धशतक पुर्ण केलं. आयपीएलच्या इतिहासात डावाच्या पहिल्याच षटकात सहा चौकार खेचणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. शिवाय धावांचा पाठलाग करतानाही असा पराक्रम कोणत्याच फलंदाजाने केला नव्हता. पृथ्वीने 41 चेंडूत 82 धावा केल्या तर धवनने 47 धावा केला आणि विजयाचा पाया रचला.

दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. नितीश राणा 15, राहुल त्रिपाठी 19 तर कर्णधार इयॉन मॉर्गन  0 व सुनील नरेन 0 यांना यांना धावा काढण्यात अपयश आलं. मात्र त्यानंतर शुभमन गिल आणि रसेलने आक्रमक खेळी करत कोलकाताला 154 धावा फलकावर लगावल्या.

दरम्यान, दिल्लीने कोलकाताला पराभूत करत पॉइंट्स टेबलमध्ये बंगळुरु मागे टाकत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. या सामन्याआधी दिल्ली तिसऱ्या क्रमांकावर होती. दिल्लीने या मोसमातील 7 सामन्यांपैकी 5 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर 2 वेळा त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

मुंबईत कोरोनाचा आकडा वाढताच, वाचा आजची धक्कादायक आकडेवारी

“आम्हाला दाभाडकरांचे संस्कार हवेत, दाभोळकरांचे नाही…”

‘मिशन ऑक्सिजन’साठी क्रिकेटचा देव’ मदतीला धावला, केलं मोठं दान

पुण्यात कोरोनाचा उद्रेक, दिवसभरात तब्बल ‘इतक्या’ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद!

काय सांगता! पोलार्डने बॅटने नाही तर हेलमेटने मारला चौकार, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More