बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

श्रेयस अय्यर दिल्लीसाठी ठरला ‘संकटमोचक’! अखेरपर्यंत एकटयाने खिंड लढवत मुंबईवर केली मात

मुंबई |  मुंबई इंडिअन्स आणि  दिल्ली कॅपिटल्समधील रोेमांचक सामन्यात दिल्लीने विजय मिळवला आहे. अखेरपर्यंत रंगलेल्या सामन्यामध्ये आर. आश्विनने षटकार खेचत दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. मुंबईच्या 130 धावांचा पाठलाग करताना दिल्लीचीही दयनीय अवस्था झाली होती.

दिल्लीची आघाडीची फळी कोलमडली होती मात्र दुसरीकडे माजी कर्णधार श्रेयस अय्यरने एक बाजू लावून धरली होती. श्रेयसने शेवटपर्यंत मैदानावर थांबत सामना मुंबईच्या बाजून झुकून दिला नाही. जर श्रेयसही बाद झाला असता तर सामन्याचा निकाल वेगळा लागू शकला असता. दिल्लीने विजय मिळवत आपली प्ले ऑफमधील जागा निश्चित केली आहे.

मुंबईने प्रथम फलंदाजी करताना त्यांची सुरूवाता खराब झाली, सलामीवीर रोहित शर्मा लवकर बाद झाला. त्यानंतर आलेल्या सुर्यकुमारने सर्वाधिक 33 धावा केल्या मात्र इतर एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. दिल्लीच्या घातक गोलंदाजीसमोर मुंबईचे स्टार खेळाडू टिकू शकले नाहीत. दिल्लीकडून अक्षर पटेल आणि आवेश खान यांनी मिळून 6 गडी बाद केले.

दरम्यान, कमी लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीचीही सुरूवात निराशाजनक राहिली, पृथ्वी शॉ, शिखर धवन आणि स्टीव स्मिथ लवकर बाद झाले होते. त्यानंतर पंत आणि अय्यरने केलेल्या भागीदारीमुळे दिल्ली सामना पकडत चालली आहे अस वाटत असताना पंत बाद झाला त्यानंतर हेटमायर आणि अक्षर पटलेही बाद झाले. परंतू श्रेयसने संयम ठेवत आर. आश्विनच्या साथीनं विजय मिळवला.

थोडक्यात बातम्या- 

श्रेयस अय्यर दिल्लीसाठी ठरला ‘संकटमोचक’! अखेरपर्यंत एकटयाने खिंड लढवत मुंबईवर केली मात

“‘त्यांच्यामुळे’ मी राजकारणात स्थिर झालो, माझा आणि राजकारणाचा दूरदूरचा संबंध नव्हता”

गांधी जयंतीदिवशी सोशल मीडियावर धार्मिक कट्टरतावाद्यांकडून नथूराम गोडसे जिंदाबादचा नारा!

“मंत्री या नात्याने माझ्या विचारांना चालना देण्याचं काम करणं तुमचं कर्तव्य आहे”

“मेहनत, खुप घाम गाळून जनतेचा विश्वास मिळवलाय, कोणत्याही पीआर एजन्सीमुळे नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More