बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अटीतटीच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा रोमहर्षक विजय

मुंबई | मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सच्या सामन्यात दिल्लीने मुंबईवर रोमहर्षक विजय मिळवला आहे. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात हेटमायरने चौकार मारत विजय नोंदवला. कमी धावसंख्येचा पाठलाग करताना दिल्ली सामना गमावणार की काय अशी परिस्थिती होती मात्र दिल्लीच्या फलंदाजांनी संयम खेळी करताना एकेरी आणि दुहेरी धावांच्या मदतीने लक्ष्याचा पाठलाग केला.

दिल्लीकडून ‘गब्बर’ शिखर धवनने सर्वाधिक 45 धावा केल्या. तर स्टीव्ह स्मिथने 33 धावांची खेळी केली. मुंबईचा फिरकीपटू राहुल चहरने झेलबाद केलं. धवनने 5 चौकार आणि एका षटकारासह 45 धावांची खेळी केली. धवननंतर पंतही स्वस्तात माघारी परतला, पण शिमरोन हेटमायर आणि ललित यादव यांनी विजयी खेळी केली.

रोहित शर्मा आणि क्विंटन डि कॉक यांनी मुंबईच्या डावाची सुरुवात केली. तिसऱ्या षटकात दिल्लीचा गोलंदाज मार्कस स्टॉइनिसने क्विंटन डि कॉकला बाद करत मुंबईला पहिला धक्का दिला.  त्यानंतर मात्र मुंंबईच्या फलंदाजांना भागीदारी करता आली नाही. दिल्लीचा गोलंदाज अमित मिश्राने 4 षटकात 24 धावा देत 4 बळी घेतले. मुंबईच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीने केवळ 4 गडी गमावले. तब्बल 11 वर्षानंतर दिल्लीने या मैदानावर विजय साकारला आहे.

दरम्यान, शेवटच्या षटकात पोलार्ड गोलंदाजी करत होता. मात्र पहिल्याच चेंडूवर हेटमायरने खणखणीत चौकार ठोकला. त्यानंतर पाच चेंडूत एक धाव हवी असताना पोलार्डने नो बॉल टाकला आणि दिल्लीने विजय मिळवला.

थोडक्यात बातम्या- 

“देशाला लॉकडाऊनपासून वाचवायचं असेल तर….”; नरेंद्र मोदींनी राज्यांना केलं हे आवाहन

जगात सर्वाधिक वेगाने लसीकरण हे भारतात होत आहे- नरेंद्र मोदी

अमित शहा म्हणजे ब्रह्मदेव नव्हे- जितेंद्र आव्हाड

भाजपच्या ‘या’ दोन नेत्यांचं पितळ उघडं पाडणार- नवाब मलिक

महाराष्ट्रात कडक लॉकडाऊन लागू होणार, मुख्यमंत्री करणार घोषणा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More