बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिल्ली कॅपिटल्सचा पंजाब किंग्सवर विजय, धवनची जबरदस्त अर्धशतकी खेळी

मुंबई | दिल्ली कॅपिट्ल्सने पंजाब किंग्सवर शानदार विजय मिळवला आहे. पंजाबच्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करत दिल्लीने हा सामना 7 विकेट्सने जिंकला आहे. या सामन्यात दिल्लीच्या शिखर धवनने नाबाद 69 धावांची खेळी केली.

केएल राहुलच्या जागी मयांक अग्रवालकडे पंजाब संघाची धुरा आहे. पंजाबने प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर प्रभासिमरन सिंह 12 धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेला ख्रिस गेल केवळ 13 धावा करु शकला. यानंतर डेविड मलान आणि मयांकनं डाव सावरला. मलान 26 धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेला दीपक हुडा केवळ एका धावेवर बाद झाला.

एकीकडे गडी बाद होत होते तर दुसरीकडे मयंकने आपली बाजी लावून धरली होती. शाहरुख खान 4 तर ख्रिस जॉर्डन 2 धावांवर बाद झाले. मयांकने नाबाद 99 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 8 चौकार आणि 4 षटकार ठोकले. पंजाबने 20 षटकात 166 धावा केल्या. दिल्लीकडून कगिसो रबाडानं तीन विकेट घेतल्या तर आवेश खान, अक्षर पटेलनं एक एक विकेट घेतली.

दरम्यान, दिल्लीने हे आव्हान 17.4 षटकांमध्ये 3 विकेट्स गमावून पूर्ण केलं. दिल्लीकडून सलामीवीर शिखर धवनने सर्वाधिक 69 धावांची नाबाद खेळी केली. पृथ्वी शॉने 39 धावा केल्या तर स्टीव्ह स्मिथने 24 धावांची खेळी केली. दिल्लीचे फक्त तीन गडी बाद झाले. शिवरम हेटमायरने अंतिम षटकांमध्ये 4 चेंडूत 16 धावांची स्फोटक फलंदाजी करत दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

थोडक्यात बातम्या- 

बकरी, गाय, झोपडी ही संपत्ती, रोजंदारीवर जाणाऱ्या मजुराची पत्नी झाली आमदार

आई-पत्नीमधील सततच्या वादाला वैतागून मुलाने उचललं धक्कादायक पाऊल!

पश्चिम बंगाल निवडणुकीच्या निकालावर अमित शहांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

ही लढाई अशीच सुरू राहील- राहुल गांधी

वयाच्या 25 व्या वर्षी खासदार झालेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दामोदर शिंगडा यांचं निधन!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More