बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिल्ली कॅपिटल्सची विजयी सलामी; पृथ्वी- शिखरच्या जोडीपुढे चेन्नईचे गोलंदाज फेल

मुंबई | आयपीएलचा दुसरा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्समध्ये हा सामना खेळला गेला. चेन्नई सुपर किंग्सच्या खराब सुरुवातीनंतर मोईन अली आणि मिस्टर आयपीएल सुरेश रैना यांनी चेन्नईला सावरलं. याचवेळी वरिष्ठ खेळाडूनं दिलेला मंत्र दिल्ली कॅपिटल्सच्या कामी आला.

चेन्नईने दिलेले 189 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या दिल्लीच्या सलामीवीरांनी चेन्नईला जोरदार प्रत्युत्तर दिलं. दिल्लीच्या दोन्ही सलामीवीरांनी धडाकेबाज अर्धशतकं झळकावत विजयाचा पाया रचला. पृथ्वी शॉने अवघ्या 38 चेंडूत 72 धावांची धडाकेबाज खेळी केली. यात 3 षटकार आणि 9 चौकारांचा समावेश होतात. तर शिखरने 54 चेंडूत 85 धावा फटकावल्या. त्यात 2 षटकार आणि 10 चौकारांचा समावेश होता.

युवा फलंदाज रिषभ पंतचा आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून हा पहिलाच सामना होता. या पहिल्याच सामन्यात रिषभची गाठ त्याचा गुरु महेंद्रसिंह धोनीसोबत होती. त्यामुळे पंत कर्णधार म्हणून कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचंच लक्ष होत. याचदरम्यान, सामन्यात रिषभ पंतने देखील विजयी चौकार लावत सामना जिंकला आहे.

दरम्यान, आयपीएलच्या इतिहासात हे दोन्ही संघ एकूण 23 वेळा आमनेसामने भिडले आहेत. यामध्ये धोनीची अनुभवी चेन्नई वरचढ राहिलेली आहे. चेन्नईने 15 सामन्यात दिल्लीवर विजय मिळवला आहे. तर दिल्लीने चेन्नईला 8 सामन्यात पराभूत केलं आहे. आज दिल्ली कॅपिट्ल्सने चेन्नईच्या संघाला धूळ चारली आहे.

थोडक्यात बातम्या –

…म्हणून पुण्यातील लेडी डॉनला आला राग, स्वतःच्याच प्रियकराची केली हत्या

तरुणानं सेक्स पॉवर वाढवण्याच्या गोळ्या घेतल्या, मात्र त्यानंतर घडला अत्यंत धक्कादायक प्रकार

लॅाकडाऊनमुळं महाराष्ट्रातील ‘या’ खासदाराला मिळाला वेळ, मग काय थेट गहू कापायला घेतला!

इतक्या दिवसांचा असू शकतो महाराष्ट्रातील लॉकडाऊन, दोन दिवसात होणार निर्णय!

“मुख्यमंत्री महोदय, तुमच्या मंत्र्यांना आवरा”; भर बैठकीत देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More