सामना सुरु असताना थेट मैदानात कार घुसली; इशांत, गंभीर, रैना अवाक्

नवी दिल्ली | क्रिकेटचा सामना असताना कार थेट मैदानात घुसल्याने एकच खळबळ उडाली. नवी दिल्लीच्या दिल्ली विरुद्ध उत्तर प्रदेश सामना सुरु असताना हा प्रकार घडला. 

धक्कादायक बाब म्हणजे यावेळी इशांत शर्मा, गौतम गंभीर, सुरेश रैना आणि ऋषभ पंत यांसारखे स्टार खेळाडू मैदानात होते. 

दिवसाचा खेळ संपण्याआधी पंच सूर्यप्रकाश किती आहे हे तपासत होते. मात्र या व्यक्तीने थेट खेळपट्टीवर कार चालवली. आपल्याला गाडी आत आणण्यापासून कोणीच रोखलं नाही, असं या व्यक्तीचं म्हणणं होतं.