बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पंजाब निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवालांचा रिक्षा प्रवास, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | पंजाब निवडणुका तोंडावर आल्याने निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील त्या दृष्टीने तयारी सुरु केली आहे. केजरीवाल सध्या पंजाब दौऱ्यावर असून त्यांनी आज मोगा येथे सभा घेतली. यावेळी केजरीवाल यांनी एका रिक्षाचालकाच्या घरी जेवण केलंच शिवाय यावेळी त्यांनी रिक्षाप्रवासाचा आनंद देखील लुटला.

केजरीवाल दौऱ्यावर असताना एका रिक्षाचालकाने त्यांना घरी जेवायला बोलावले होते. केजरीवालांनी ते आमंत्रण तर स्विकारलंच. शिवाय त्यांनी जेवण झाल्यानंतर त्या रिक्षावाल्याचा रिक्षामधून रिक्षाप्रवासाचा आनंदही घेतला. यावेळी केजरीवाल यांच्यासोबतच खासदार भगवंत मान आणि पक्षातील इतर नेत्यांनी देखील रिक्षाप्रवासाचा आनंद घेतला. त्यानंतर केजरीवाल यांनीही त्या रिक्षाचालकाला दिल्लीला स्वत:च्या घरी जेवणाचे आमंत्रण दिले.

मोगा येथील सभेत केजरीवालांनी पंजाबमधील महिलांसाठी एक घोषणा देखील केली. सभेत बोलताना ते म्हणाले, जर पंजाबमध्ये आम आदमी पार्टीचं सरकार आलं तर 18 वर्षांवरील प्रत्येक महिलेला दर महिन्याला 1000 रुपये दिले जातील, असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. शिवाय यामध्ये वृद्ध महिलांना मिळणाऱ्या पेन्शन व्यतिरीक्त हे पैसे दिले जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं  आहे.

यावेळी केजरीवालांनी पंजाबच्या जनतेला संबोधित केले. शिवाय विरोधकांवरही जोरदार हल्लाबोल केला आहे. पंजाबमध्ये बनावट केजरीवाल फिरत असल्याचं त्यांनी म्हटलंय. “मी जे काही वचन पंजाबच्या जनतेसाठी देऊन जातो. दोन दिवसांनी ते तेच वचन देतात. करत मात्र काहीच नाही. मी दवाखाने बनविण्याचं वचन दिल्यानंतर बनावट केजरीवालांनीही तेच वचन दिलं,” असा आरोप करत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

पाहा व्हिडीओ

 

 

थोडक्यात बातम्या-

काँग्रेसने आपल्या ‘त्या’ विधान परिषद उमेदवारांची नावं केली जाहीर

“गद्दारी केल्यास मी सहन करणार नाही, मी आमदार असताना…”

“आर्यन खानने जे काही भोगलं त्याची भरपाई कोण देणार?”

अफगाणिस्तानात महिलांचे हाल; तालिबान्यांनी सुनावलं नवं फर्मान

प्रियांका चोप्रानं नावात केला मोठा बदल, धक्कादायक निर्णय घेण्याची शक्यता

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More