दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांच्या मुलीचं अपहरण करण्याची अज्ञाताकडून धमकी

नवी दिल्ली |  दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मुलीचं अपहरण करण्याची धमकी देण्यात आली आहे. अज्ञाताकडून CMO ला मेल करण्यात आला आहे.

विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री कार्यालयाला 9 जानेवारीला एक अज्ञात मेल आला होता. लगोलग त्या मेलची एक प्रत दिल्ली पोलिस आयुक्तांना देण्यात आली आहे.

आलेल्या मेलची सध्या पोलिस तपासणी करत आहेत. तो मेल सायबर कॅफेमधून करण्यात  आला आहे, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे.

दरम्यान, या प्रकरणाची योग्य ती चौकशी चालू आहे. लवकरच ती पूर्ण ती होईल, अशी माहिती दिल्ली पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-मोदी सरकारने दिलेली आश्वासने पाळली नाहीत- शरद पवार

-राष्ट्रवादीमध्ये मोठी घरवापसी होणार? अजित पवारांचे संकेत

-भाजप दंगली घडवणारं सरकार- प्रकाश आंबेडकर

-…तर मला भर चौकात फाशी द्या- धनंजय मुंडे

-अखेर नगरच्या 18 नगरसेवकांवर आली ‘संक्रांत’ मात्र जगताप पिता पुत्रांना राष्ट्रवादीचं अभय