जर्मन महिलेसमोर हस्तमैथुन करणाऱ्या तरुणाला अटक

दिल्ली | जर्मन महिलेसमोर हस्तमैथुन करणाऱ्या तरुणाला दिल्ली पोलिसांनी अटक केलीय. पीडित महिला जवाहरलाल नेहरु विद्यापीठात पीएचडी करते.

गुरुवारी आपल्या कुत्र्याला फिरवण्यासाठी बाहेर पडली असता एक युवक आपल्याकडे पाहून हस्तमैथुन करत असल्याचं या महिलेच्या लक्षात आलं. त्यानंतर तिने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो कारमध्ये बसून फरार झाला.

दरम्यान, पीडित महिलेने या कारचा फोटो काढला. या कारच्या नंबरवरुन पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं.