Top News देश

शेतकऱ्यांच्या लाठीचारापासून वाचण्यासाठी पोलिसांनी लाल किल्ल्यावरून घेतल्या उड्या, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं. या रॅली दरम्यान पोलीस आणि शेतकरी आमने सामने आले आणि पोलीस आणि शेतकरी यांच्यामध्ये चमकम पाहायला मिळाली.

शेतकरी लाल किल्ल्यात घुसले तिथे ध्वज फडकावला त्यासोबतच एक व्हिडीओ समोर आला ज्यामध्ये शेतकरी पोलिसांना लाठीचार करताना दिसत आहेत. या लाठीचारापासून वाचण्यासाठी पोलीस लाल किल्ल्यावरून उड्या मारताना दिसत आहेत.

जवळपास 15 फुटांच्या भिंतीवरुन पोलीस उड्या मारत आहेत. कारण उडी मारण्याशिवाय त्यांच्याकडे कोणताच पर्यात नव्हता. हा व्हिडीओ सोशल माध्यामांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांकडून बॅरिकेड्स तोडत अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली. इतकंच नाही तर विरोध करणाऱ्या पोलिसांवर तलवारी उगारण्यात आल्या. त्यामुळे सध्या दिल्लीमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.

 

थोडक्यात बातम्या-

…अन् काहीतरी वेगळा डाव साधायचा, असा विचार केंद्र करत तर नाही ना- आदित्य ठाकरे

शरद पवारांच्या टीकेला प्रवीण दरेकरांचं प्रत्युत्तर; म्हणाले…

दिल्लीत ट्रॅक्टर परेड दरम्यान झालेल्या हिंसाचारप्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल!

दिल्लीत शेतकऱ्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला?; समोर आला धक्कादायक व्हिडीओ

शीतल आमटेंचा विश्वासघात कुणी केला?; पती गौतम करजगींचे धक्कादायक आरोप

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या