बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणी न्यायालयाने दिला मोठा निर्णय!

नवी दिल्ली | सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणात दिल्ली न्यायालयाने काँग्रेस नेते शशी थरुर यांच्यावरील आरोप फेटाळले आहेत. शशी थरुर यांना निर्दोष ठरवण्यात आलं आहे. गेल्या साडेसात वर्षांपासून मी या त्रासातून जात आहे. मला दोषमुक्त केल्यामुळे मी आपला आभारी आहे, असं शशी थरुर यांनी म्हटलंय.

दिल्लीच्या लीला पॅलेसमधील हॉटेल रुममध्ये त्या मृतावस्थेत आढळल्या होत्या. आपली पत्नी झोपली असावी, असा समज करुन शशी थरुर यांनी दुर्लक्ष केलं. मात्र बराच वेळ त्यांना जाग आली नाही, तेव्हा त्यांना आपल्या पत्नीचा मृत्यू झाल्याचं समजल्याचा दावा केला जातो.

सुनंदा यांच्या मृत्यूनंतर शशी थरुर संशयाच्या गर्तेत आले होते. थरूर यांनी सुनंदा यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याचे आणि त्रास दिल्याचे आरोप झाले होते. सुनंदा यांचा मृत्यू खूप हायप्रोफाईल ठरला होता. 29 सप्टेंबर 2014 ला एम्सच्या मेडिकल बोर्डाने सुनंदा पुष्कर यांचा पोस्टमार्टेम रिपोर्ट दिल्ली पोलिसांना सोपवला होता.

सुनंदा शरीरात असं काही रसायन सापडलं होतं, जे पोटात गेल्यावर रक्तात मिसळले की विष बनतात. याशिवाय सुनंदा यांच्या शरीरावर जखमाही आढळल्या होत्या. त्यांच्या खोलीत अल्प्रैक्सच्या 27 गोळ्यादेखील सापजल्या होत्या. मात्र त्यांनी किती गोळ्या घेतल्या होत्या हे स्पष्ट झालं नाही.

थोडक्यात बातम्या- 

“बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेल्या इतिहासामुळे महाराष्ट्रात दगंली घडल्या”

शिवसेनेला धक्का! ‘या’ मोठ्या नेत्याची आमदारकी धोक्यात

“भाजपने देशात हत्याकांड घडवलं, नरेंद्र मोदींनी देशाची जाहीर माफी मागावी”

विवाहित महिला आणि अविवाहित पुरूषांमधील लिव्ह इन संबंध अवैध- उच्च न्यायालय

“आपला देशच भारीये, आपलं नशीब आहे की आपण भारतात राहतो”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More