दिल्ली हादरली! चुलत बहिणीसोबत लिव्ह-इन; लग्नाची मागणी करताच मित्रासोबत रचला भयानक प्लॅन

Delhi Crime live in partner kills and burns cousin sister body in suitcase

Delhi Crime | प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) पहाटेच राजधानी दिल्लीत (Delhi) एका सुटकेसमध्ये (Suitcase) तरुणीचा जळालेला मृतदेह (Burnt Body) सापडल्याने खळबळ उडाली होती. प्रजासत्ताक दिनानिमित्त सुरक्षा व्यवस्था कडक असल्याने तिचा मृतदेह दूर नेण्याचा प्रयत्न फसला. अखेरीस दिल्लीतच एका निर्जन स्थळी मध्यरात्री तिला जाळण्यात आले. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीने पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली. (Delhi Crime)

दिल्लीच्या गाझीपूरमध्ये (Ghazipur) हा मृतदेह सापडला होता. या प्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. यापैकी एक या तरुणीचा चुलत भाऊ आहे. मृत मुलीचे नाव शिल्पा पांडे (Shilpa Pande) आहे. अमित तिवारी (Amit Tiwari) तिचा चुलत भाऊ लागतो. त्याच्यासोबत ती खोडा कॉलनीमध्ये (Khoda Colony) लिव्ह-इनमध्ये (Live-in) राहत होती. वर्षभर त्यांच्यात संबंध होते. दोघेही २२ वर्षांचे होते. शिल्पाने त्याच्यावर लग्नासाठी (Marriage) दबाव टाकण्यास सुरुवात केली होती.

२५ जानेवारीच्या रात्री सर्व काही आटोपल्यावर शिल्पाने पुन्हा एकदा अमितला लग्नाबद्दल विचारले. यावेळी अमित भडकला आणि त्याने दारूच्या नशेत (Intoxication) तिचा गळा आवळला (Strangled). ती मृत पावल्याचे लक्षात येताच त्याने आपल्या एका मित्राला फोन केला आणि तिला संपवायचे असल्याचे सांगितले.

पोलिसांपासून वाचण्यासाठी आखला भयानक प्लॅन

मित्र आणि तो मृतदेह कुठे जाळता येईल हे पाहण्यासाठी कार घेऊन निघाले. परंतु, पोलिसांच्या कडक बंदोबस्तामुळे (Police Security) त्यांची दोनवेळा तपासणी (Checking) झाली. यामुळे त्यांनी दिल्लीबाहेर तिचा मृतदेह जाळण्याचा प्लॅन (Plan) बदलला आणि जवळपासच मृतदेह जाळण्याचा निर्णय घेतला. घरी येत शिल्पाला सुटकेसमध्ये कोंबले आणि निर्जन स्थळी नेले. तिथे डिझेल (Diesel) टाकून तिला जाळण्यात आले. (Delhi Crime)

पोलिसांना पहाटे सव्वा चार वाजता याबाबत माहिती मिळाली. त्यांनी त्या भागात आलेल्या वाहनांचा शोध सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये (CCTV Footage) उत्तर प्रदेशची (Uttar Pradesh) एक कार दिसली.

पोलिसांनी कार मालकाला पकडले. त्याने ती कार अमितला विकल्याचे सांगितले. त्यानंतर सर्व सुत्रे अमितकडे वळाली. त्याला पकडल्यावर चुलत बहिणीसोबत लिव्ह-इन, शरीरसंबंध आणि लग्नाच्या मागणीबाबत सर्व उघड झाले. शिल्पाचे आई-वडील सुरतला (Surat) राहतात, ते या संबंधांबाबत अनभिज्ञ होते. (Delhi Crime)

Title: Delhi Crime live in partner kills and burns cousin sister body in suitcase

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .