नवी दिल्ली । पत्नीनेच आपल्या पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत घडली आहे. साडीच्या सहाय्याने गळा आवळून पत्नीने आपल्या पतीची हत्या केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 35 वर्षीय सरिता देवीला अटक केली आहे.
पतीची हत्या केल्यानंतर सरिता देवी त्याचा मृतदेह घेऊन सफदरजंग रुग्णालयात पोहोचली होती, पतीचा नैसर्गिक मृत्यू दाखवण्याचा तिने बनाव रचला होता, मात्र डॉक्टरांच्या तपासणीत मृताच्या गळ्याभोवती गळा आवळल्याचे निशाण दिसत होते, पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये गळा आवळून हत्या झाल्याचं निष्पन्न झालं.
पोलिसांनी अधिक तपासासाठी सरिता देवीला ताब्यात घेतलं. त्यानंतर तीने आपणच पतीची हत्या केल्याचं सांगितल्यानंतर पोलीसही चक्रावले होते. कुटुंबासह दिल्लीतील फतेहपूर बेरी भागात राहणाऱ्या सरिता देवीच्या म्हणण्यानूसार, “पती सिकंदर साहनीला टीबीचा आजार होता. त्याला दारु पिण्याचे व्यसनसुद्धा लागलं होते आणि तो कुठल्याही प्रकाराचं काम करत नव्हता”
दरम्यान, पती आपला छळ करत होता, असा दावाही तीनं केला आहे. तो दारु पिऊन यायचा आणि मला मुलांसमोर शिवीगाळ तसेच मारहाण करायचा, असं सरिता देवीनं सांगितलं आहे. याच कारणामुळे आपण त्याची हत्या केल्याचं तीचं म्हणणं आहे.
थोडक्यात बातम्या-
प्रेमसंबंध माझ्यासोबत अन् पाहते दुसऱ्याकडे, त्यानं उचलेल्या पावलानं ठाणे हादरलं!
मुंबईत खासदाराची आत्महत्या, अधिकारी व बड्या मंत्र्यांची नावं लिहून ठेवल्यानं खळबळ
आतुरता संपली; नवीन टाटा सफारी लाँच, किंमतही ठरली
कोरोना नियमांचं उल्लंघन, भाजप नेत्यासह तिघांवर गुन्हा दाखल
पुण्यातील ‘या’ आमदाराला कोरोनाची लागण, अजित पवारांच्या बैठकीला होते उपस्थित!