बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ब्रेकिंग! दिल्ली-देहरादून शताब्दी एक्सप्रेसच्या कोचला भीषण आग 

नवी दिल्ली | दिल्लीतून देहरादूनला जाणाऱ्या शताब्दी ट्रेनच्या एका कोचला आग लागल्याची घटने समोर आली आहे. आग लागल्याची माहिती समजल्यावर हा डबा रेल्वेपासून वेगळा करण्यात आला असल्याचं समजतंय. त्यासाोबतच यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समजत आहे.

कोचला आग लागल्याचं समजल्यावर लोकोपायलटने ब्रेक मारत गाडी थांबवली. त्यानंतर आग लागलेला कोच रिकामा करण्यात आला आणि आगीला पसरवण्यापासून थांबवण्यात आलं. कोचमधील प्रवाशांना दुसऱ्या कोचमध्ये हलवण्यात आलं. त्यानंतर पुन्हा ट्रेन देहरादूनला पाठवण्यात आली.

इंजिनपासून 8 व्या क्रमांकाच्या डब्यात ही आग लागली होती. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दल आलं होतं तर अग्निशमन दलाच्या जवानांनी या आगीवर नियंत्रण मिळवलं.

दुपारी 12.30 च्या दरम्यान  ही घटना घडली. आग लागलेल्या कोचमध्ये एकूण 30 प्रवाशी होते. ही आग कशामुळे लागली याचं मुळ कारण समोर आलं नाही मात्र शॉट सर्कीटमुळे आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

थोडक्यात बातम्या- ANI 

मनोरंजन क्षेत्रात कोरोनाची दहशत, बॉलिवूडचे ‘हे’ दोन मोठे कलाकार कोरोनाच्या जाळ्यात!

खुशखबर! फक्त 1.11 लाखात घरी न्या किया सेल्टाॅस कार

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मंत्रालयातील ‘या’ विभागांमध्ये चालणार दोन शिफ्टमध्ये काम

बकरीसमोर पाऊट करणं पडलं महागात, बकरीने केलं असं काही की…

महाराष्ट्रातील या जिल्ह्यात नाईट कर्फ्यू लागू, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More