नवी दिल्ली | दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपचा दणदणीत विजय झाला आहे. 70 पैकी 62 जागांवर आपने विजय मिळवला. यामध्ये अरविंद केजरीवालांचा मराठी शिलेदार प्रवीणकुमार देशमुख यांचाही विजय झाला आहे. जंगपुरा विधानसभा मतदारसंघातून ते विजयी झाले आहेत.
प्रवीणकुमार देशमुख हे नाव मराठी आहे, पण ते मूळचे मध्य प्रदेशातील बैतूल येथील आथनेर या छोट्या गावातील रहिवासी आहेत. एबीएचं शिक्षण घेतलेल्या प्रवीणकुमार यांनी अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला प्रभावित होऊन राजकारणात प्रवेश केला होता. आपने त्यांना दिल्ली उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती.
प्रवीणकुमार देशमुख आमदार म्हणून सलग दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. 16 हजार 63 मतांनी त्यांनी विजय मिळवला. विशेष म्हणजे ते एका सामान्य कुटुंबातून येत असून त्यांचे वडील आजही पंक्चरचं दुकान चालवतात.
भोपाळमध्ये त्यांच्या वडिलाचं ज्योती टायर वर्क्स नावाचं पंक्चरचं दुकान आहे. प्रवीणकुमार पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आल्यावरही त्याच्या वडिलांनी आपलं काम सोडलं नव्हतं. तसेच माझं काम मला प्रिय आहे. त्यामुळे मी हे कधीही सोडणार नाही, अशी प्रतिक्रिया वडिलांनी माध्यमांना दिली आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
…तर मनसेचा एकही आमदार दिसणार नाही- इम्तियाज जलील
दादा खेळत रहा, वेळ चांगला जाईल; ‘सामना’तून चंद्रकांत पाटलांवर बाण
महत्वाच्या बातम्या-
मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी; शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याने उदयनराजे आक्रमक
‘दस बहाने 2.0’ गाण्यामध्ये श्रद्धा आणि टायगरचा बोल्ड अंदाज; पाहा व्हिडीओ
हिंमत असेल तर शिवसेनेने एकट्याने विधानसभा लढवावी- चंद्रकांत पाटील
Comments are closed.