दिल्लीत पगार जास्त तर मुंबईत सुट्ट्या, जागतिक बँकेचा आहवाल

दिल्ली | नोकरीतील सोयी दिल्लीपेक्षा मुंबई चांगली असल्याचा अहवाल जागतिक बँकेने दिलाय. नोकरीतील सुट्ट्या आणि इतर सुविधा मुंबईत जास्त, तर दिल्लीत मुंबईपेक्षा पगार जास्त, असं या अहवालातून समोर आलंय.

दिल्लीतील कर्मचाऱ्यांचा पगार मुंबईतील पगारापेक्षा 60 टक्के जास्त असल्याचं समोर आलंय. मात्र दिल्ली कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांचे प्रमाण मुंबईपेक्षा कमी आहे. दिल्लीत कर्मचाऱ्यांना वर्षभारत भरपगारी 15 रजा तर मुंबईत कर्मचाऱ्यांना वर्षभरात भरपगारी 21 रजा मिळतात.

दरम्यान, मुंबईतील कर्मचाऱ्यांचा पगार इतर विकसनशील देशांच्या तुलनेतसुद्धा कमी असल्याचही या अहवालात म्हटलंय.