बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिलदार शेतकरी! आपल्या शेतात काम करणाऱ्या मजुरांना घरी जाण्यासाठी विमानाची तिकीटं दिली काढून

नवी दिल्ली | केंद्र सरकारने या कामगारांना घरी जाण्याची परवानगी देत रेल्वे गाड्यांची सोय केली. मात्र त्याआधीच काही कामगार शेकडो किलोमीटरचा प्रवास करत चालत आपल्या गावाकडे निघाले होते. काही मजुरांना रस्ते अपघातात आपले प्राणही गमवावे लागले. अशा परिस्थितीत दिल्लीजवळील एका शेतकऱ्याने सर्वांसमोर एक वेगळा आदर्श घालून दिला आहे.

दिल्लीजवळील तिगीपूर गावातले पप्पन सिंह हे मशरुमची शेती करतात. पप्पन यांनी आपल्या शेतात काम करणाऱ्या 10 मजूरांना त्यांच्या बिहार येथील घरी जाण्यासाठी चक्क विमानाची तिकीटं काढून दिल्याचं कळतंय.

केंद्र सरकारने देशांतर्गत विमान प्रवासला परवानगी दिली आहे. यानंतर पप्पन सिंह यांनी आपल्या मजुरांना थेट विमानाने पाठवण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी सकाळी सहा वाजता या सर्व कामगारांचं विमान दिल्लीवरुन पाटणा शहराच्या दिशेने जाणार आहे.

हे कामगार श्रमिक एक्सप्रेसने बिहारला जाण्यासाठी रवाना झाले होते. मात्र त्यांना गाडीत शिरताच आलं नाही. शेकडो किलोमीटर चालत आपल्या गावाकडे जाणं हा पर्याय मला माझ्या कामगारांसाठी योग्य वाटला नाही. यासाठीच मजुरांच्या विमान प्रवासासाठी आवश्यक सर्व बाबी पूर्ण करत आपण त्यांना तिकीट काढून दिल्याचं पप्पन सिंह यांनी सांगितलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

फडणवीसजी, महाराष्ट्रापेक्षा गुजरातची अवस्था बिकट आहे- जयंत पाटील

…म्हणून रेल्वेमंत्र्यांनी एकदम 152 ट्रेन उलट-सुलट सोडल्या- अनिल परब

महत्वाच्या बातम्या-

राज्यात आज कोरोनाचे किती रुग्ण वाढले?; पाहा तुमच्या भागात किती?

“सरकारच्या फेकाफेकीचा पर्दाफाश आम्हाला करावाच लागेल”

आमदार रोहित पवार यांचं धाडस; पीपीई किट घालून पोहोचले रुग्णालयात

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More