नवी दिल्ली | दिल्लीत प्रजासत्ताक दिनाला गालबोट लागणारी परिस्थिती घडली, शेतकरी आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीनं या प्रजासत्ताक दिनाला गालबोट लागलं. या दरम्यान एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला असून त्यासंदर्भात नानाविध फसवे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
मृत्यू झालेला शेतकरी पोलिसांनी लावलेले बॅरिकेट्स ट्रॅक्टरच्या सहाय्याने तोडण्याचा प्रयत्न करत होता. या प्रयत्नात ट्रॅक्टर पटली झाला आणि ट्रॅक्टरखाली सापडून शेतकऱ्याचा मृत्यू झाला.
शेतकऱ्याच्या मृत्यूसंदर्भात नानाविध दावे केले जात असले तरी ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दरम्यान, पोलिसांनी गोळी मारल्याचा आरोप करुन काही जणांनी या प्रकरणाला हिंसक वळण देण्याचा प्रयत्न केल्याचं समोर येत आहे.
दरम्यान, शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर त्या ठिकाणी उपस्थित शेतकरी चांगलेच आक्रमक झालेले पहायला मिळाले. काही काळ गोंधळाची परिस्थिती झाल्यानंतर शेतकऱ्यांनी मृत शेतकऱ्याचं शव त्या ठिकाणाहून हलवलं.
पाहा व्हिडीओ-
#WATCH | A protesting farmer died after a tractor rammed into barricades and overturned at ITO today: Delhi Police
CCTV Visuals: Delhi Police pic.twitter.com/nANX9USk8V
— ANI (@ANI) January 26, 2021
थोडक्यात बातम्या-
शीतल आमटेंचा विश्वासघात कुणी केला?; पती गौतम करजगींचे धक्कादायक आरोप
आंदोलक शेतकऱ्यांनी लाल किल्ल्यावरील तिरंग्याला धक्काही लावला नाही!
पहिले ते चौथीचे वर्ग कधी सुरु होणार?; शिक्षणमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
“हा माणूस कृषी मंत्री होता याचं आश्चर्य वाटतं, इतक्या निर्लज्जपणे शेतकऱ्यांबद्दल बोलतोय”
‘शीतल आज तू हवी होतीस’; लेकीसाठी विकास आमटेंची भावनिक पोस्ट