देश

निकाल लागताच दिल्लीकरांना केंद्र सरकारचा दणका; गॅस सिलेंडर 144 रुपयांनी महागला

नवी दिल्ली | दिल्ली विधानसभा निवडणुकीचा मंगळवारी निकाल लागला. यात आम आदमी पक्षाला घवघवीत यश मिळालं आहे, तर भाजपला अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्या आहेत. यातच विधानसभा निवडणूक पार पडताच केंद्र सरकारकडून गॅस सिलेंडरच्या दरांमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे.

दिल्लीकरांसाठी गॅस सिलेंडरचा दर तब्बल 144 रुपयांनी वाढला आहे. त्यामुळे निकाल लागताच दिल्लीकरांना गॅस सिलेंडर दरवाढीचा दणका बसला आहे. त्यामुळे आता 14 किलोचा गॅस सिलेंडर 858.50 रुपयांना मिळणार आहे.

या दरवाढीवर काँग्रेसने टीका केली आहे. कालच दिल्ली निवडणुकांचा निकाल लागला आणि आज भाजप सरकारने खरे रंग दाखवायला सुरुवात केली. जनतेसमोर मांडायला कामच नसल्याने अशा परिस्थितीत दरवाढ केल्यास कोणत्या तोंडाने मतं मागायला जाणार, हे चांगलेच ठाऊक असलेल्या भाजप सरकारने दिल्लीचा निकाल लागताच सर्वसामान्यांना ‘महंगाई का करंट’ दिलाय, असं म्हणत काँग्रेसने टीका केली आहे.

दरम्यान, दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपला 62 जागा, भाजपला 8 तर काँग्रेसला भोपळाही फोडता आलेला नाही.

ट्रेंडिंग बातम्या-

मंत्र्यांच्या बंगल्यांवर सरकारकडून कोटींची उधळपट्टी; थोरात, भुजबळांच्या बंगल्यांवर सर्वाधिक खर्च

वाड्या वस्त्यांची जातीवाचक नावे होणार हद्दपार?

महत्वाच्या बातम्या-

“देशभक्ती म्हणजे उत्तम शिक्षण, हॉस्पिटल सुविधा, वीज आणि पाणी पुरवणं होय”

व्वा, पवार साहेब काय लाॅजिक आहे; पवारांच्या ‘त्या’ टीकेवर भाजपचा खोचक प्रश्न

“अरे बंगल्यांवर उधळपट्टी कशाला करताय, बंगले पूर्ण होण्याआधीच तुम्ही जाणार आहात”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या