Top News

पी. चिदंबरम यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

Loading...

नवी दिल्ली | देशाचे माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते पी. चिदंबरम यांचा आयएनएक्स मीडिया प्रकरणात जामिन अर्ज दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे चिदंबरम यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.

न्यायमुर्ती सुनील गौर यांनी 25 जानेवारीला याबाबतचा आपला निर्णय राखून ठेवला होता. यावर सुनावणी करताना आज चिदंबरम यांचा जामिन अर्ज फेटाळला आहे.

Loading...

2007ला आयएनएक्स मीडियाने 305 कोटी परदेशी भांडवल मिळवलं होतं. यासाठी आवश्यक असणाऱ्या एफआयपीबीच्या मंजूरीमध्ये अनियमितता आढळून आली होती. सीबीआयच्या केलेल्या चौकशीमध्ये चिदंबरंम यांचे पुत्र कीर्ती यांचा हात असल्याचं समोर आलं होतं. यानंतर कीर्ती यांना अटक करण्यात आला होती.

15 मे 2017 ला चिदंबरम यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान, आता अटकेपासून बचावासाठी चिदंबरम यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असल्याची माहिती आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-सरकार आपल्या डोक्यावर मिरच्या वाटतंय- खासदार अमोल कोल्हे

-दानवेंच्या होम ग्राऊंडवर धनंजय मुंडेंची तोफ धडाडली; म्हणतात हे तर ‘खाऊसाहेब दानवे…!’

-शिवसेना प्रवेशाच्या चर्चांवर छगन भुजबळ म्हणतात…

Loading...

-…परंतू या सगळ्याला राज ठाकरे बळी पडणार नाहीत- प्रकाश आंबेडकर

-काँग्रेसला धक्का; निर्मला गावित यांचा आमदारकीचा राजीनामा

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या