बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘लाल किल्ला तुमच्या मालकीचा, मग 150 वर्षे का लावली’ वंशज म्हणणाऱ्यांना दिल्ली उच्च न्यायालयानं झापलं

नवी दिल्ली | राजधानी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ला (Red Fort) आमच्या मालकीचा आहे, असा दावा मुघलांची वंशज असलेल्या सुलताना बेगम (Sultana Begam) यांनी केला होता. या दाव्यावरुन आता उच्च न्यायालयानं (High Court) सुलताना बेगम यांना चांगलंच सुनावलं आहे.

शेवटचा मुघल सम्राट बहादूर शाह जफर (Bahadur Shah Zafar) यांची वारसदार असल्याचं म्हणत लाल किल्ला आपल्या नावे करण्याची मागणी करणारी याचिका 68 वर्षीय सुलताना बेगम यांनी केली होती. आता लाल किल्ला (Red Fort) ताब्यात घेण्याची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

लाल किल्ल्याची मागणी करणारी याचिका फेटाळत, तुम्ही 150 वर्ष काय करत होता, असा प्रश्नच उच्च न्यायालयानं केला आहे. सुलताना बेगमच्या पूर्वजानंनी या आधी लाल किल्ल्यावर आपला हक्क असल्याचा दावा कधीही केला नाही. मग आता न्यायालय या प्रकरणात काही करु शकत नाही, असं उच्च न्यायालयानं म्हटलं.

दरम्यान, इतिहासाचे ज्ञान फारच कमकुवत आहे, परंतु 1857 मधील अन्यायाविषयी इतकी वर्षे गप्प का होता? याचबरोबर, याचिकाकर्ते बहादूर शाह जफरचे वंशज असल्याचे सिद्ध करणारे कोणतेही कागदपत्र नसल्याचे दिल्ली उच्च न्यायालयाला आढळून आलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

एसटी संपात फूट! संप मागे घेण्याच्या घोषणेनंतरही कर्मचारी संपावर ठाम

“हे कसलं सरकार आहे ज्यांना सभागृह देखील सांभाळता येत नाही”

अखेर चिंता मिटली! Omicron बाबत दिलासादायक माहिती आली समोर

एसटी संप मागे! संपाची नोटीस देणारे अजय गुजर यांची मोठी घोषणा

म्हाडाची परिक्षा ऑनलाईन पद्धतीनेच; पेपर फुटीनंतर नवी तारीख जाहीर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More