बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘भाजप नेत्यांवर अजून FIR का दाखल झाला नाही?’ असं सुनावणाऱ्या न्यायमूर्तींची बदली!

नवी दिल्ली | नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी या मुद्द्यावरुन दिल्लीत हिंसाचार उसळला आहे. आतापर्यंत 23 जणांचा मृत्यू झाला असून 100 पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांना खडेबोल सुनावणाऱ्या न्यायाधीशांची बदली करण्यात आली आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मुरलीधर यांच्या बदलीचा आदेश जारी करण्यात आला आहे. बुधवारी याच न्यायमूर्तींनी दिल्ली हिंसाचार सुनावणी प्रकरणात भाजप नेते कपिल मिश्रा, अनुराग ठाकूर, प्रवेश वर्मा यांच्यावर अजून एफआयआर का दाखल नाही असं विचारत पोलिसांवर कडक ताशेरे ओढले होते.

न्या. मुरलीधर यांची बदली झाल्यामुळे केंद्र सरकारवर टीका सुरु झाली आहे. भाजप नेत्यांविरोधात एफआयआर दाखल करा म्हणणाऱ्या न्यायमूर्तींची एका दिवसात बदली करुन केंद्र सरकार काय साध्य करु इच्छित आहे? असे सवाल विचारले जाऊ लागले आहेत.

दरम्यान, अनुराग ठाकूर, प्रवेश वर्मा यांनी दिल्ली विधानसभेच्या प्रचार काळात ‘देश के गद्दारोको, गोली मारो सालो को’ अशा घोषणा दिल्या होत्या. तर कपिल मिश्रा यांनी दिल्लीत दुसरे शाहीन बाग होऊ देणार नाही असं म्हटलं होतं. तसेच पोलिसांना शक्य नसेल तर आम्ही कायदा हातात घेऊ, असं चिथावणी खोर वक्तव्य केलं होतं.

Image

ट्रेंडिंग बातम्या-

“महिलांचा लैंगिक छळ आणि बलात्कार केल्यास फाशी होणार”

राजधानीत बाहेरून आलेल्यांनी हिंसाचार केला- अरविंद केजरीवाल

महत्वाच्या बातम्या-

…नाहीतर पेकाटात नक्कीच लाथ बसेल; ‘सामना’तून भाजपवर टीकास्त्र

मी मरेन पण तुम्हाला रोज माझ्या वाक्यांची आठवण होणार- इंदोरीकर महाराज

“आम आदमी पक्षाला अमित शहांनी विकत घेतलंय का?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More