बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिल्लीत खलबतं सुरुच; देवेंद्र फडणवीस पुन्हा अमित शहांच्या भेटीला

नवी दिल्ली | अलिकडच्या काही दिवसांमध्ये दिल्लीत अनेक बड्या नेत्यांच्या भेटीगाठींना वेग आला आहे. पावसाळी अधिवेशनामुळे संसदेचे सर्व सदस्य दिल्लीमध्ये आहेत. तसेच गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील भाजपचे प्रमुख नेते देखील दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत.

दिल्लीत भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठींचा वेग वाढला असतानाच आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस देखील गृहमंत्री अमित शहांच्या भेटीसाठी दिल्लीत दाखल झाले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.

देवेंद्र फडणवीस आणि अमित शहांच्या आजच्या बैठकीत अनेक महत्वपूर्ण मुद्यांवर चर्चा पार पडण्याची शक्यता आहे. तसेच या भेटीनंतर राज्यातील भाजपच्या कार्यकारणी मंडळात बदल होतील काय?, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. यामुळे या बैठकीवर राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून आहे.

दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील दोन दिवसांपूर्वी दिल्लीत अमित शहांची भेट घेतली होती. यामुळे पाटलांचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. यानंतर आमच्या पक्षाचा प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा विचार नसल्याचं सांगत पाटलांनी या चर्चांना पूर्णविराम दिला होता.

थोडक्यात बातम्या –

“पंतप्रधान मोदी तुम्ही सभागृहात या अन् हिम्मत असेल तर चर्चा करा”

‘नावात काय आहे’ म्हणणाऱ्यांना झटका, ‘हे’ नाव असेल तर 501 रुपयांचं पेट्रोल फुकट मिळणार!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रासोबत चर्चा करायला पाहिजे होती – रावसाहेब दानवे

‘सत्ता आली तरी तुम्ही आम्ही कोण तर कपबश्या धुणारे’; ठाकरे सरकारमधील मंत्र्यानं दिला घरचा आहेर

‘…तर सिनेमाचं तिकिट आणि पाॅपकाॅर्न मिळणार फ्री’; पीव्हीआरची भन्नाट ऑफर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More