बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गेल्या वर्षभरात राजधानी दिल्लीने गमावले ‘हे’ 3 माजी मुख्यमंत्री!

नवी दिल्ली | राजधानी दिल्लीने मागच्या वर्षभरात 3 माजी मुख्यमंत्री गमावलेत. त्यामुळे दिल्लीच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

काल(मंगळवारी) भारताच्या माजी परराष्ट्रमंत्री आणि दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री सुषमा स्वराज यांचं निधन झालं. ऑक्टोबर ते डिसेंबर 1998 या काळात त्यांनी दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं.

काँग्रेसच्या नेत्या आणि दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं जुलै 2019 मध्ये निधन झालं. सर्वाधिक काळ त्या दिल्लीच्या मुख्यमंत्री राहिल्या. 1998 ते 2013 या काळात त्यांनी  दिल्लीचं मुख्यमंत्रीपद सांभाळलं.

भाजपचे जेष्ठ नेते आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री मदन लाल खुराना यांचं ऑक्टोबर 2018 मध्ये निधन झालं. 1993 ते 1996 या काळात त्यांनी दिल्लीचं मुख्यमंत्रीपद सांभाळलं. या तीनही नेत्यांच्या एक्झीटने राजधानी दिल्लीबरोबरच देशाचंही खूप मोठं नुकसान झालं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-अजित पवारांवर टीका करणारा ‘तो’ बॅनर राष्ट्रवादीने जाळला!

-‘मुतऱ्या तोंडाचा अजित…’; गिरीश महाजन-अजित पवार यांच्यात जुंपली!

-…अन् छत्रपती संभाजीराजे निघाले पूरग्रस्तांना मदतीला!

-“महाजन पळवा-पळवी करतील की राज्यातील पूरस्थितीची पाहणी”

-मला कोणालाही सिद्ध करुन दाखवायची गरज वाटत नाही; विराटने टीकाकारांना सुनावलं

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More