नवी दिल्ली | अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी बुधवारी सकाळी त्यांच्या राहत्या घरातून अटक केली. यानंतर केंद्रातील भाजप नेत्यांकडून देखील ठाकरे सरकारवर टीका करण्यात येतेय. त्यातच आता दिल्लीतील महाराष्ट्र सदनाबाहेर राज्यात आणीबाणी 2.0 अशा आशयाचे पोस्टर्स लागलेत.
भाजपाचे नेते तेजिंदरपाल सिंह बग्गा यांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदनाबाहेर राज्यात आणीबाणी 2.0 असे पोस्टर लावले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा फोटो आहे.
आपातकाल 2.0 pic.twitter.com/dkh1Ye0ubM
— Tajinder Pal Singh Bagga (@TajinderBagga) November 5, 2020
या पोस्टरवर, आणीबाणी 2.0 मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे, असं लिहीण्यात आलं आहे.
महाराष्ट्रातील भाजपाकडून ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडण्यात येतं होतं. त्यातच आता दिल्लीतील भाजपाचे नेते तेजिंदरपाल सिंह बग्गा यांनी थेट महाराष्ट्र सदनाबाहेर पोस्टर लावत ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय.
महत्त्वाच्या बातम्या-
“रोहित शर्माच्या दुखापतीची सीबीआयद्वारे चौकशी करा”
नोव्हेंबर अखेरीस महाराष्ट्र पूर्णतः सुरु होईल- विजय वडेट्टीवार
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयी दाव्याला जो बायडेन यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
सिरीयल पुढे सुरु ठेवण्यासाठी नराधमांना पाठीशी घालणं चुकीचं- प्राजक्ता गायकवाड
अर्णब गोस्वामींवर पोलिसांनी केलेली कारवाई योग्यच- सचिन सावंत