अश्लीलतेचा कळस! दिल्ली मेट्रोत तरुणीने केली चक्क प्रग्नेन्सी टेस्ट, Video व्हायरल

Delhi Metro | दिल्ली मेट्रो नेहमीच वेगवेगळ्या कारणाने चर्चेत राहत असते. मेट्रोमध्ये प्रवास करणाऱ्या काही नागरिकांकडून खूप विचित्र प्रकार आतापर्यंत घडले आहेत. कधी बिकिणी घालून प्रवास करणारी महिला, कधी खुलेआम अश्लील चाळे करणारे कपल तर कधी काहीतरी अजीबच चाळे करणारे लोकांचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. मात्र, आता (Delhi Metro) हद्दच पार करण्यात आली आहे.

नागरिकांच्या सोयीसाठी असलेली ही दिल्ली मेट्रो आता सोशल मीडियावर इन्फ्लूएंसरच्या नावाखाली अश्लीलपणा करणाऱ्या तरुणांचा जणू अड्डाच बनली आहे. अशा व्हिडीओंमुळे अनेकदा कारवाई देखील करण्यात आली आहे. तरी ही मंडळी काही थांबायचं नाव घेईना.
सोशल मीडिया इनफ्लूएंसर्स यांची सार्वजनिक ठिकाणी अश्लील व्हिडीओ बनवून प्रसिद्धी मिळवायची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.

अश्लील व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांचा संताप

अशात एका कपलचा एक अश्लील व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओत ही तरुणी तिच्या हातात प्रग्नेन्सी टेस्ट किट घेऊन कॅमेरात दाखवते. प्रग्नेन्सी टेस्टमध्ये दोन लाल रंगाच्या रेषा असल्याने ती प्रग्नेन्ट असल्याची शक्यता असते. ते टेस्ट किट तसंच हातात धरून तिच्या पार्टनरला ही गोष्ट सांगायला ती जाते. प्रग्नेन्सी टेस्ट(Delhi Metro) पाहताच तरुण आनंदी होतो आणि तिला मिठी मारतो.

या व्हायरल व्हिडिओवर आता नेटकी चांगलेच संतापले आहेत. यावर अनेक संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत. “डिलिव्हरी पुढच्या स्टेशनला करा आता” असं कॅप्शन देत हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे.

दिल्ली मेट्रोत तरुणीने केली प्रग्नेन्सी टेस्ट

एका युजरने कमेंट करत लिहिलं, “लाज नाही का वाटत यांना.” तर दुसऱ्याने लिहिलं की, “दिल्लीच्या मेट्रोमध्ये काहीही होऊ शकतं.” तर तिसरा एक म्हणाला की, “सगळं काही आता मेट्रोमध्येच करून घ्या.” अशा (Delhi Metro)प्रतिक्रिया या व्हिडिओवर उमटत आहेत.

यापूर्वी देखील असाच एक किळसवाणा व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यात ते कपल एकमेकांच्या तोंडात थुंकून कोल्ड ड्रिंक पित होते. आता पुन्हा एकदा याच कपलचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

News Title –  Delhi Metro Pregnancy Test Video goes viral

महत्त्वाच्या बातम्या-

“पुणे बरबाद व्हायला..”; राज ठाकरेंचा राज्य सरकारवर संताप

मोठी बातमी! कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर तातडीने पार पडली शस्त्रक्रिया; नेमकं झालं काय?

“त्याने पँटची चैन उघडली अन् माझा हात…”, प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव

“लाडकी बहीण योजनेसाठी पैसे नसतील तर राज्यपालांचा बंगला विका”

“शरद पवार दंगली घडवण्याचं काम करत आहेत”; ‘या’ नेत्याचा थेट आरोप