वेदना हीच तुमची शक्ती समजा आणि लढा दया!

नवी दिल्ली | सुरूवात चांगली झालीय, पुढे लढत राहा, तुमची वेदना हीच तुमची शक्ती समजा आणि लढा दया, असंच मी कोपर्डीच्या निर्भयाच्या पालकांना सांगू इच्छिते, असं दिल्लीतील निर्भयाच्या आईनं म्हटलंय.

दिल्लीतील निर्भयाच्या बलात्कार आणि हत्येच्या घटनेला 5 वर्षे झाली. परंतु आरोपी अजूनही जिवंत आहेत. कोपर्डी बलात्कार हत्या प्रकरणात केवळ एकाच कोर्टानं फाशीची शिक्षा दिलीय, अजून मोठी लढाई लढायचीय, असंही दिल्लीतील निर्भयाच्या आईनं सांगितलं.

दोष कायम मुलीलाच दिला जातो, छोटे कपडे का घातले?, रात्री बाहेर का गेलीस?, पण आरोपींना तू तिथं का होतास कोणी विचारत नाही, व्यवस्था जोपर्यंत ठोस पावलं उचलत नाही, तोपर्यंत देशातील कोणतीच लेक सुरक्षित राहणार नाही, अशी खंतही त्या माऊलीनं व्यक्त केली.