बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देशाला अस्वस्थ करणारी ही दृश्यं तुम्ही पाहिली का?

नवी दिल्ली | सीएएच्या मुद्द्यावरुन राजधानी दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनाला आता हिंसाचाराचं गालबोट लागलं आहे. राजधानीत हिंसाचाराचा अक्षरशः आगडोंब उसळला असून समाजविघातक घटकांनी दिल्लीच्या विविध भागात आगी लावल्याच्या घटना घडल्या आहेत.

आंदोलक आणि पोलिसांमध्ये अनेक ठिकाणी चकमकीच्या घटना देखील घडल्या असून एका पोलिसासह सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. काल दिवसभर हिंसाचार झाल्यानंतर रात्री देखील अनेक ठिकाणी आग लावल्याच्या घटना घडल्या आहेत.

दिल्लीच्या हिंसाचाराचे व्हिडीओ आता सोशल मीडियात व्हायरल झाले असून हा आपला भारत आहे का?, असा प्रश्न पडावा, अशी ही दृश्यं आहे.

पाहा दिल्लीच्या हिंसाचाराचे धक्कादायक फोटो आणि माहिती-

जमीन पर गिरा शख्स, सिर पर 8 लाठियां, CAA पर हिंसा की सबसे DISTURBING तस्वीरें

हा फोटो सोशल मीडियात मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक दोन नव्हे तर तब्बल 8 जण एका व्यक्तीला काठीच्या सहाय्याने मारत असल्याचं दिसत आहे. फोटो सौ. Reuters

जमीन पर गिरा शख्स, सिर पर 8 लाठियां, CAA पर हिंसा की सबसे DISTURBING तस्वीरें

सोमवारी उत्तर पूर्व दिल्लीतील जाफराबाद मौजपूरसह काही भागांमध्ये हिंसाचार भडकला. यावेळी काही जणांनी जोरदार दगडफेक केली तर काही ठिकाणी आग लावण्याच्या घटना देखील घडल्या.

जमीन पर गिरा शख्स, सिर पर 8 लाठियां, CAA पर हिंसा की सबसे DISTURBING तस्वीरें

हिंसाचार सोमवारी सकाळी सुरु झाला होता, रात्री उशिरापर्यंत तो सुरु होता. मंगळवारी सकाळी देखील अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना सुरु असून आतापर्यंत या हिंसाचारात 100 पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत.

जमीन पर गिरा शख्स, सिर पर 8 लाठियां, CAA पर हिंसा की सबसे DISTURBING तस्वीरें

दिल्लीच्या गोकलपुरी भागात टायरची अनेक दुकानं आहेत. हिंसाचार करणारांनी ही दुकानं लक्ष्य केली. ही दुकानं काही तास अशीच पेटलेल्या अवस्थेत होती.

जमीन पर गिरा शख्स, सिर पर 8 लाठियां, CAA पर हिंसा की सबसे DISTURBING तस्वीरें

भजनपुरा भागात काही बस आणि गाड्यांनाही आग लावण्यात आली. पेट्रोल पंपात देखील आग लावल्याचा प्रकार समोर आला आहे.

जमीन पर गिरा शख्स, सिर पर 8 लाठियां, CAA पर हिंसा की सबसे DISTURBING तस्वीरें

पोलिसांनी कारवाई करताना काही मेट्रो स्टेशन्स बंद करण्याचा निर्णय घेतला. काही ठिकाणी कलम १४४ लागू करण्यात आलं आहे.

जमीन पर गिरा शख्स, सिर पर 8 लाठियां, CAA पर हिंसा की सबसे DISTURBING तस्वीरें

दिल्लीत सुरु असलेल्या हिंसाचारामुळे आज काही भागातील शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. तसेच पोलिसांचा फौजफाटा देखील तैनात करण्यात आला आहे.

जमीन पर गिरा शख्स, सिर पर 8 लाठियां, CAA पर हिंसा की सबसे DISTURBING तस्वीरें

हिंसाचारामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सतर्क झाले आहेत. दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह काही उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची त्यांनी मंगळवारी दुपारी १२ वाजता बैठक आयोजित केली आहे.

जमीन पर गिरा शख्स, सिर पर 8 लाठियां, CAA पर हिंसा की सबसे DISTURBING तस्वीरें

गृहमंत्र्यांच्या सुत्रांनूसार गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी रात्री देखील एक बैठक घेतली होती. यामध्ये सुरक्षा यंत्रणेशी संबंधित बड्या अधिकाऱ्यांचा समावेश होता.

जमीन पर गिरा शख्स, सिर पर 8 लाठियां, CAA पर हिंसा की सबसे DISTURBING तस्वीरें

हिंसाचारात शहादराचे डीसीपी अमित शर्मा जखमी झाले आहेत. सोमवारी रात्री त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली, मंगळवारी सकाळी त्यांना शुद्ध आली.

जमीन पर गिरा शख्स, सिर पर 8 लाठियां, CAA पर हिंसा की सबसे DISTURBING तस्वीरें

डीसीपी अमित शर्मा यांची प्रकृती सध्या स्थीर असल्याचं रुग्णालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार मात्र सुरुच आहेत. गोकुळपुरा भागात झालेल्या हिंसाचारात ते जखमी झाले होते.

जमीन पर गिरा शख्स, सिर पर 8 लाठियां, CAA पर हिंसा की सबसे DISTURBING तस्वीरें

सोमवारी दिल्लीच्या तब्बल ४५ ठिकाणी आग लाग लागल्याच्या घटना रिपोर्ट झाल्याची माहिती अग्नीशमन दलानं दिली आहे. आग विझवण्यासाठी गेलेले तीन जवान जखमी झाले आहेत.

जमीन पर गिरा शख्स, सिर पर 8 लाठियां, CAA पर हिंसा की सबसे DISTURBING तस्वीरें

फायरब्रिगेडच्या गाड्यांना देखील समाजकंटकांनी लक्ष्य केल्याचं समोर आलं आहे. एका गाडीला आग लावण्यात आली आहे.

जमीन पर गिरा शख्स, सिर पर 8 लाठियां, CAA पर हिंसा की सबसे DISTURBING तस्वीरें

मौजपुरा भागात मंगळवारी सकाळी देखील हिंसाचार उफळला. काही दुचाकी गाड्यांना आग लावण्यात आली तसेच काही काळ दगडफेक करण्याची देखील घटना घडली.

जमीन पर गिरा शख्स, सिर पर 8 लाठियां, CAA पर हिंसा की सबसे DISTURBING तस्वीरें

सोमवारी पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या एका तरुणाचा व्हिडीओ समोर आला होता. शाहरुख असं या तरुणाचं नाव असल्याचं समजतंय. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.

जमीन पर गिरा शख्स, सिर पर 8 लाठियां, CAA पर हिंसा की सबसे DISTURBING तस्वीरें

IANS च्या माहितीनूसार मंगळवारी देखील काही मेट्रो स्टेशन बंद ठेवण्याचा निर्णय मेट्रो प्रशासनानं घेतला आहे. यातील बहुतांश मेट्रो स्टेशन्स हिंसाचार प्रभावित भागात आहेत.

जमीन पर गिरा शख्स, सिर पर 8 लाठियां, CAA पर हिंसा की सबसे DISTURBING तस्वीरें

हिंसाचाराच्या घटना सातत्याने घडत असल्यानं पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. मोठ्या प्रमाणात एकत्र येणाऱ्या नागरिकांना प्रतिबंध केला जात आहे.

जमीन पर गिरा शख्स, सिर पर 8 लाठियां, CAA पर हिंसा की सबसे DISTURBING तस्वीरें

दिल्लीच्या ९ ठिकाणांना अतिसंवेदनशील मानण्यात आलं आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

जमीन पर गिरा शख्स, सिर पर 8 लाठियां, CAA पर हिंसा की सबसे DISTURBING तस्वीरें

दिल्लीतील नॉर्थ इस्ट जिल्ह्याला सर्वात संवेदनशील जिल्हा म्हणून जाहीर करण्यात आलं आहे. या भागात कलम १४४ लागू करण्यात आलं असून ते २४ मार्चपर्यंत कायम ठेवण्यात येणार आहे.

जमीन पर गिरा शख्स, सिर पर 8 लाठियां, CAA पर हिंसा की सबसे DISTURBING तस्वीरें

मंगळवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक महत्त्त्वाची बैठक बोलावली आहे. ज्यामध्ये दिल्लीतील बिघडलेल्या परिस्थितीवर चर्चा होणार आहे.

जमीन पर गिरा शख्स, सिर पर 8 लाठियां, CAA पर हिंसा की सबसे DISTURBING तस्वीरें

भाजपचे नेते कपिल मिश्रा यांनी या हिंसाचार प्रकरणी अरविंद केजरीवाल यांच्यासह आम आदमी पक्षावर टीकास्त्र सोडलं आहे. अरविंद केजरीवाल यांनी आंदोलकांना रस्ते मोकळे करण्याचं आवाहन करावं, असं त्यांनी म्हटलं आहे.

जमीन पर गिरा शख्स, सिर पर 8 लाठियां, CAA पर हिंसा की सबसे DISTURBING तस्वीरें

 ट्रेंडिंग बातम्या-

“आता सुप्रिया ताईंना ‘सेल्फी विथ खड्डे’चा विसर पडला आहे का?”

अजित पवारांनी आपला ‘तो’ शब्द खरा करुन दाखवला!

महत्वाच्या बातम्या-

“भाजपला पाहून जुने दिवस आठवले, आमचेही घसे असेच कोरडे पडायचे”

‘मलंग’ चित्रपटामुळे वाढली दिशा-आदित्यची लोकप्रियता

ह.भ.प. इंदोरीकर महाराजांना दिलासा; सायबर सेलनं केला ‘हा’ मोठा खुलासा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More