Top News देश

धक्कादायक! आंदोलनकर्त्यांचा पोलिसांवर तलवारी घेऊन हल्ल्याचा प्रयत्न, एक पोलीस जखमी

नवी दिल्ली | शेतकरी आंदोलनकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने दिल्लीमधील आंदोलनाची परिस्थिती चिघळली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान पोलीस आणि आक्रमक यांच्यात वाद झाला. त्यावेळी शेतकऱ्यांनी दगडफेक केली.

शेतकऱ्यांनी राडा घातला आहे. आंदोलनकर्त्यांची संख्या जास्त असल्यामुळे त्यांनी आपले ट्रॅक्टर अंगावर घालण्याच प्रयत्न केला. तसंच तलवार हातात घेऊन पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्नही केला आहे.

या हल्ल्यात 1 पोलीस जखमी झाला आहे. पोलिसांकडून बॅरिकेड्स लावून आंदोलकांना रोखण्याता प्रयत्न केला. मात्र आंदोलकांनी बॅरिकेड्सची तोडफोड करत लाल किल्ल्याच्या दिशेने वाटचाल केली.

दरम्यान, आंदोलक शेतकऱ्यांनी लाल किल्ल्यामध्ये प्रवेश करुन तिथल्या खांबावर झेंडा फडकवला आहे. एकंदरित दिल्लीतील शेतकरी आंदोलनाची परिस्थिती हाता बाहेर गेली आहे.

 

थोडक्यात बातम्या-

दिल्लीत शेतकरी आक्रमक, शेतकरी आंदोलक लाल किल्ल्यावर धडकले!

“मोदी सरकारकडून घटनेवर हल्ला, राज्यघटनेचं संरक्षण करावं लागेल”

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण, दगडफेकीनंतर पोलिसांचा लाठीचार्ज

‘राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी संविधान स्तंभ उभारा’; सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

प्रख्यात गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांना पद्मविभूषण

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या