दिल्लीत हलला पाळणा, शिवबा जन्मला गं बाई शिवबा जन्मला!

दिल्ली | आपल्या पराक्रमाने दिल्लीच्या तख्तालाही हादरे देणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या जन्माचा सोहळा राजधानी दिल्लीत पार पडतोय. शिवबा जन्मला गं बाई शिवबा जन्मलाचे सूर दिल्लीत ऐकायला मिळत आहे. 

राजधानी दिल्लीत यापूर्वीही शिवजन्मोत्सव साजरा होत होता. राजधानीतील मराठी बांधव आपापल्या परीने हा सोहळा साजरा करत होते. मात्र सर्वांना एकत्र करुन कोल्हापूरचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी यंदा एकच मोठा सोहळा आयोजित केलाय.

आजपासून सुरु होणाऱ्या या शिवजन्मोत्सवामध्ये 300 कलाकारांचं ढोलपथक, 200 जणांची वारकरी दिंडी, 20 जणांचं शाहिरी पथक, 80 कलाकारांचे मर्दानी खेळ पथक, धनगरी ढोल पथक असा थाट पहायला मिळणार आहे.