बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिल्ली पुन्हा अव्वल! भेदक गोलंदाजीने राजस्थानला 33 धावांनी धूळ चारली

मुंबई | आयपीएलच्या दुसऱ्या सत्रातील 37 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान राॅयल्स यांच्या खेळण्यात आला. या सामन्यात दिल्लीने राजस्थानला 33 धावांनी धुळ चारत प्लेऑफचं स्थान जवळजवळ पक्क झालं आहे. या सामन्यात दिल्लीच्या गोलंदाजांपुढे राजस्थानचे फलंदाज पुर्णपणे अपयशी ठरले आहेत. कर्णधार संजू साॅमसंगची खेळी व्यर्थ ठरली आहे.

प्रथम दिल्लीने फलंदाजी केली. सुरूवातीपासून पृथ्वी शाॅ आणि शिखर धवनने आक्रमक फटकेबाजी सुरू केली. मात्र दोघेही झटपट बाद झाले. त्यानंतर श्रेयस अय्यर आणि रिषभ पंतने दिल्लीची पारी संभाळली. त्यानंतर शेवटी शिमरन हेटमायर आणि अक्षर पटेलने काही फटकेबाजी केली आणि अखेर दिल्लीने राजस्थानला 155 धावांचं आव्हान दिलं.

दिल्लीने दिलेल्या 155 धावांचं आव्हान पार करताना राजस्थानची सुरूवात खराब झाली. दिल्लीच्या गोलंदाजांनी राजस्थानच्या सलामीवीरांना तंबूत पाठवलं. त्यानंतर कर्णधार संजू सॅमसंगने राजस्थानला सावरण्याचा प्रयत्न केला. त्याने एकाकी झुंज दिली. अखेर राजस्थानला 20 षटकात केवळ 121 धावा करता आल्या आणि दिल्लीने हा सामना 33 धावांनी जिंकला.

दरम्यान, या विजयासह दिल्लीने पहिल्या स्थानी झेप घेतली आहे. दिल्लीने 10 सामन्यात 8 विजय मिळवले आहेत. त्यामुळे आता दिल्लीला 16 अंकासह प्लेऑफमध्ये स्थान आता जवळजवळ पक्क झालं आहे.

थोडक्यात बातम्या-

‘या’ तीन राज्यांना ‘गुलाब’ चक्रीवादळाचा धोका; महाराष्ट्राला देखील अलर्ट जारी

नरेंद्र मोदींच्या संपत्तीत ‘इतक्या’ लाखांची वाढ; वाचा नक्की किती आहे संपत्ती

‘मोदी म्हणत असतील, बघ तुझी कशी जिरवली आता घाल…’; अजित पवारांची टोलेबाजी

“बहुजनांच्या पोरांनी फक्त सतरंज्या उचलाव्यात अशी यांची मानसिकता”

‘लोकांना वाटलं मी लय सिरीयस आहे, आपलं शेवटचं मत टाकावं’; दानवेंनी सांगितला मजेशीर किस्सा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More