शरद पवार नव्हे, सोनियांकडे विरोधी ऐक्याचं नेतृत्व?

नवी दिल्ली | काँग्रेससह विरोधी पक्षांना भाजप सरकारविरोधात एकजूट करण्याचे प्रयत्न दिल्लीत सुरु झालेत. मात्र या ऐक्याचं नेतत्व शरद पवार नव्हे, तर सोनिया गांधींच्या हाती जाण्याची शक्यता आहे.

शरद पवार यांनी या ऐक्यासाठी पुढाकार घेतला. मुंबईत संविधान बचाव रॅली काढल्यानंतर त्यांनी दिल्लीत विरोधी पक्षांची बैठक बोलावली होती. मात्र पवार या ऐक्याचं नेतृत्व करु पाहात असल्याचं लक्षात आल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी हे नेतृत्व सोनिया गांधींकडे यावे यासाठी प्रयत्न सुरु केल्याचं करतंय. 

काँग्रेसच्या प्रयत्नांचा एका भाग म्हणून विरोधकांची यापुढची बैठक सोनिया गांधींच्या निवासस्थानी बोलावण्यात आली आहे. 1 फेब्रुवारी ही बैठक होण्याची शक्यता आहे.