बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! रागाच्या भरात डिलिव्हरी बॉयनं फोडलं तरुणीचं नाक, कारण ऐकून तुम्हाही व्हाल हैराण

मुंबई | आपल्याकडे खाण्याचे बरेचजण शौकीन आहेत. त्यात आता आपल्या मनात आलं की एखादा पदार्थ खावा तर आपण कधीही तो ऑर्डर करून मागवू शकतो. आपण अनेकदा कामात व्यस्त असतो तेव्हा ऑनलाईन ऑनलाईन फूड मागवतो. मात्र एका तरूणीला ऑनलाईन ऑर्डर करणं महागात पडलं आहे.

एका तरूणीनं झोमॅटोवरून जेवण ऑर्डर केलं मात्र तो डिलिव्हरी बॉयनं उशिर केल्यामुळे तरूणीने तिची ऑर्डर कॅन्सल केली. मात्र काही वेळानंतर तो डिलिव्हरी बॉय आला आणि तरूणीला जेवण देत होता पण तरूणीने जेवण घेण्यास नकार कळवला. तीने नकार कळवल्याने डिलिव्हरी बॉयला राग आला त्याला राग अनावर झाला आणि त्याने तरूणीच्या नाकावर बुक्का मारला. त्याने इतक्या जोरात बुक्का मारला की तरूणीच्या नाकातूनच रक्त आलं.

तरूणीने यानंतर लगेच एका व्हिडीओद्वारे घडलेला प्रकराबाबत लोकांना माहिती दिली. आपण केलेली ऑर्डर यायला उशिर झाल्यामुळे कंपनीच्या कस्टमर केअरला माहिती देऊन तिनं ऑर्डर कॅन्सल केली होती. ज्यावेळी ती तरूणी कस्टमर केअरसोबत बोलत होती त्याचवेळी डिलिव्हरी बॉय जेवण घेऊन आला तेव्हा तरूणाने जेवण नको म्हटलं तरी त्या डिलिव्हरी बॉयने घरात शिरून जेवण ठेवलं आणि तुमचा नोकर आहे का असं म्हणत नाकावर बुक्का मारला.

दरम्यान, झोमॅटोने या तरूणीची माफी मागितल्याची माहिती समजत आहे तर बंगळुरू पोलिसांनी तिला मदत केली असून लवकरच त्या व्यक्तीला अटक करण्याचं आश्वासनही दिला देण्यात आलं आहे.

 

थोडक्यात बातम्या-

“सचिन वाझेंना वकिलाची गरज नाही, उद्धव ठाकरे हेच त्यांचे वकील”

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात नव्याने निर्बंध लावण्याचा विचार- मुरलीधर मोहोळ

दीड वर्षाच्या मुलाच्या पोटात आढळला मृत गर्भ, पुण्यातील ‘या’ रूग्णालयात पार पडली यशस्वी शस्त्रक्रिया!

मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या ताफ्यावर हल्ला; पायाला झालीय गंभीर दुखापत

‘ठाकरे सरकार’ हे महाराष्ट्राच्या इतिहासातील ‘लबाड सरकार- देवेंद्र फडणवीस

सचिन वाझेंचं आणि शिवसेनेचं काय आहे जुन नातं?, मुख्यमंत्र्यांनी केला खुलासा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More