बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Omicron नाही तर ‘या’ व्हेरियंटचा अधिक धोका, धक्कादायक माहिती समोर

मुंबई | कोरोना (Corona) रूग्णसंख्या कमी होत असतानाच आता जगभरात Omicron चा धोका वाढला आहे. अनेक देशांमध्ये ओमिक्राॅनमुळे लाॅकडाऊन लावण्याची परिस्थिती उद्भवली आहे. तर ओमिक्राॅनबाधित एका रूग्णाचा ब्रिटनमध्ये मृत्यू देखील झाला आहे. अशातच आता महाराष्ट्रात ओमिक्राॅनबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. अशातच, एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

कोरोना विषाणूचं जिनोम सिक्वेंसिंग करण्यात येतं. त्यामुळे वेगवेगळ्या व्हेरियंटची माहिती मिळण्यास मदत होते. अशातच जिनोम सिक्वेंसिंगच्या सहाव्या चाचणी फेरीतील निकाल आता समोर आले आहेत. 297 नमुन्यांची चाचणी करण्यात आली होती. त्यात केवळ 2 टक्के ओमिक्राॅनचे रूग्ण आढळून आले आहेत. मात्र, इतर निकाल धक्कादायक आहेत.

चाचणी करण्यात आलेल्या या 97 नमुन्यांमध्ये 35 टक्के डेल्टा व्हेरियंट आढळला आहे. तर 62 टक्के डेल्टा डेरिव्हेटीव्ह आढळला आहे. त्यामुळे आता ओमिक्राॅनपैक्षा डेल्टा डेरिव्हेटीव्ह धोका जास्त असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या महाराष्ट्रात 32 ओमिक्राॅनबाधित रूग्ण आढळले आहेत.

दरम्यान, ओमिक्राॅनच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी खबरदारीचा इशारा दिला आहे. नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी गर्दी न करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. त्यामुळे सर्वांनी कोरोना नियमांचं पालन करणं गरजेचं आहे.

थोडक्यात बातम्या-

“जोपर्यंत ‘तो’ मंत्री जेलमध्ये जात नाही तोपर्यंत…”, राहुल गांधी आक्रमक

ठाकरे सरकारला धक्क्यावर धक्के! निवडणूक आयोगाने दिले ‘हे’ मोठे संकेत

महाराष्ट्राचं टेन्शन वाढलं! मराठवाड्यापाठोपाठ आता विदर्भात Omicronचा शिरकाव

“…म्हणून ओबीसी आरक्षण धोक्यात आलंय”; पंकजा मुंडेंची घणाघाती टीका

‘ती’ वाईट बातमी आली अन् राजनाथ सिंहांनी भाषण थांबवलं

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More