बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

डेल्टा प्लसमुळे रुग्ण सीरिअस होण्याचं प्रमाण अधिक, तरी घाबरू नका- राजेश टोपे

मुंबई | डेल्टा प्लस विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण अधिक गंभीर होतात मात्र, तरीही घाबरण्याचे कारण नाहीये, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

राज्यात कोरोनाच्या डेल्टा प्लस विषाणूचे एकूण 21 रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील 9 रुग्ण रत्नागिरी येथील जळगाव येथील 7 मुंबई, 2 आणि पालघर, सिंधुदुर्ग, ठाणे येथील प्रत्येकी 1 रुग्ण आहे. या विषाणूच्या तपासणीसाठी राज्यभरातून सुमारे 7500 नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत, असं टोपेंनी सांगितलं.

डेल्टाला डेल्टा प्लस पूर्ण बदल झालेला नाही. आता सॅम्पल सापडले त्यात पेंशट सीरिअस होण्याचे प्रमाण जास्त आहे तरी ही घाबरवण्याचे काम नाहीये. ज्या ठिकाणी डेल्टा प्लस विषाणूचे रुग्ण आढळून आले आहेत तेथे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सांगितलं आहे, असं राजेश टोपे म्हणाले. तिसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेता राज्य सरकारने तयारी केली आहे. वैद्यकीय स्तरावर, लहान मुलं यासाठी आयसीयू तयार केले जात आहेत. ऑक्सिजन 3 हजार मेट्रिक टन उपलब्ध करण्याबाबत राज्य शासन प्रयत्न करत आहे, असं राजेश टोपेंनी सांगितलं.

आशा वर्कर्सच्या मागण्यांबाबत सविस्तर चर्चा झाली. मागण्यांबाबत चर्चा केली. संप मागे घ्यावे विनंती केली पण त्यांनी मान्य केले नाही. वास्तविक संप त्यांनी करायला नको. आठ हजार रूपये प्रति महिना मिळतात त्यांना राज्य सराकरने नवा प्रस्ताव दिला त्यावर तोडगा निघेल, असंही टोपे म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

“गलवान खोऱ्यात भारतीय सैनिक वरचढ ठरले, आपले सैनिक पुरेसे प्रशिक्षित नसल्याची चीनला जाणीव”

देशात कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत पुन्हा वाढ; बरे होणाऱ्यांची संख्याही वाढली

‘सरकारमध्ये ओबीसीविरोधात कट रचण्याचं षडयंत्र सुरुये’; ओबीसी नेते आक्रमक

आज ठरणार टेस्टचा बादशाह; राखीव दिवशी सामन्याची चुरस वाढली

तिसऱ्या आघाडीच्या पार्श्वभूमीवर शत्रुघ्न सिन्हा यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More