बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुणे ग्रामीणमध्ये डेल्टा प्लसचा शिरकाव; नवे बाधित रूग्ण आढळुन आल्याने एकच खळबळ

पुणे | पुण्यातील कोरोना रूग्णसंख्या आटोक्यात आली असताना आता पुणेकरांची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. सध्या पुण्यातील शहरी भागातील कोरोना आटोक्यात आल्यानंतर आता ग्रामीण भागात कोरोनाच्या नव्या डेल्टा प्लस व्हेरिएंटने डोकं वर काढायला सुरूवात केल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, पुणे ग्रामीणमध्ये काल 2 नव्या डेल्टा प्लस रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आली असली तरी संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका अजुनही घोंगवत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच काही दिवसांपुर्वी झिका व्हायरसचा राज्यातील पहिला रुग्ण पुण्यात आढळुन आला होता.

पुण्याच्या निरा प्राथमिक आरोग्य केंद्रात डेल्टा प्लस या विषाणुने बाधित झालेले 2 रूग्ण आढळुन आले आहेत. विशेष म्हणजे पुरंदर तालुक्यातच झिका व्हायरसचा देखील रूग्ण आढळुन आला होता. तसेच डेल्टा प्लसचेही रुग्ण पुरंदर तालुक्यातच आढळुन आले आहेत. त्यामुळे परिसरातील नागरीकांमध्ये भितीचं वातावरण पाहायला मिळत आहे.

महाराष्ट्रातील कोरोना रूग्णसंख्या आटोक्यात आली असताना आता डेल्टा प्लसचे रूग्ण आढळुन येत असताना राज्य सरकारने निर्बंधामध्ये दिलेल्या सवलती काढुन पुन्हा निर्बंध लागु शकतात. त्यामुळे आता या प्रकरणात राज्य सरकार नेमकी काय पावलं उचलणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या

संजय राऊतांनी घेतली राहुल गांधींची भेट; ठाकरे सरकारच्या कामावर राहुल गांधी समाधानी

उद्धव ठाकरे आणि संभाजी भिडेंची बैठक, बंद दाराआड झाली चर्चा

ग्रामसेवकांची रिक्त पदे भरण्यात येतील- अजित पवार

दिलासादायक! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

‘सिंधूला थार भेट द्यावी’, युजरच्या मागणीवर आनंद महिंद्रा म्हणाले, ‘तिच्या गॅरेजमध्ये…’

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More