बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

डेल्टा प्लस विषाणुची फुफ्फुसावर संसर्ग होण्याची शक्यता जास्त – डॉ. एन. के. अरोरा

नवी दिल्ली | देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत दिसत असतानाच कोरोना विषाणूच्या ‘डेल्टा प्लस व्हेरियंट’नं धुमाकूळ घातलेला दिसतोय. कोरोना विषाणूच्या या बदललेल्या स्वरुपामुळे देशाला कोरोना संक्रमणाच्या तिसऱ्या लाटेला सामोरं जावं लागू शकतं. यातच आता डेल्टा प्लस विषाणुची फुफ्फुसाच्या संसर्गाची शक्यता अधिक असल्याचं समोर येत आहे.

कोरोना वर्किंग ग्रुपचे प्रमुख डॉ. एन. के. अरोरा यांनी सांगितलं की, कोरोनाच्या अन्य विषाणुंच्या तुलनेत डेल्टा प्लस विषाणुची फुफ्फुसाच्या टिश्‍युंवरील मारक क्षमता अधिक असल्याचा निष्कर्ष आहे.

डेल्टा प्लस व्हेरियंटचा फैलाव होऊ नये, म्हणून सरकार प्रयत्नशील आहे. या विषाणुंच्या अस्तित्वाबाबत आणि त्याच्या रचनेबाबत आपल्या आधीच नीट माहिती समजल्यानं आता त्यावर नियंत्रण ठेवणे किंवा त्याचा प्रादुर्भाव रोखणे हे तुलनेने अधिक सोपे जाणार आहे, असंही अरोरा यांनी म्हटलं.

दरम्यान, पीटीआयशी बोलताना अरोरा यांनी म्हटलं की, अजून या विषाणुच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास सुरू आहे. पण त्याचे अधिक रूग्ण आढळून आल्यानंतर त्याच्या प्रसाराचा पॅटर्न लक्षात येईल. अशातच ज्यांनी लसीकरण केलं आहे त्यांच्यावर या विषाणुंचा परिणाम सौम्य असेल असा अंदाज आहे.

थोडक्यात बातम्या – 

…..म्हणून लस घ्यायला गेलेल्या पत्नीचे आधार कार्ड घेऊन नवरोबा झाडावर जाऊन बसला

“राजकारणातील लोकांना अशी भीती दाखवल्यास लोकशाही संपुष्टात येईल”

महाराष्ट्रात उद्यापासून नवे निर्बंध लागू; काय सुरू?, काय बंद?, नागरिकांमध्ये मोठा संभ्रम

’40 वर्षाच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार’

“ओबीसींच्या आरक्षणासाठी फडणवीसांनी मार्ग सांगावा, त्यांनी सत्तेत येण्याची गरज नाही”

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More