बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चीनमध्ये डेल्टाचा धुमाकूळ; देशात पुन्हा दहशतीचं वातावरण

हक्का | कोरोनानं जगभरात थैमान घातलं आहे. कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी लसीकरण मोहिमेवर जोर दिला जात आहे. कोरोना विषाणूशी लढा चालू असताना डेल्टा प्लसच्या व्हेरिएंटनं धुमाकूळ घालायला सुरुवात केली. त्यामुळे सगळीकडे चिंतेचं वातावरण निर्माण झालं. अशातच आता चीनच्या फुजियान शहरातही डेल्टाचा प्लसचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे.

कोरोनानंतर आता चीनमध्ये डेल्टा प्लसचा फैलाव होत असलेला पाहायला मिळत आहे. डेल्टाच्या वाढत्या संसर्गामुळे फुजियान शहर पूर्णतः बंद करण्यात आलं आहे. एवढंच नाहीतर आता या शहरातील मॉल, जिम आणि रस्तेदेखील बंद करण्यात आले आहेत. या शहरातील नागरिकांनी घराबाहेरही पडू नये, असे आदेश स्थानिक प्रशासनानं दिले आहेत.

कोरोना विषाणूच्या डेल्टा व्हेरिएंटमुळे चीनमध्ये पुन्हा एकदा बाधितांची संख्या वाढू लागली आहे. मागील काही दिवसांत डेल्टा प्लसचा अटकाव करण्यासाठी चिनी प्रशासनानं मोठ्या प्रमाणावर कोरोना चाचणी सुरू केली. तर, दुसरीकडे लॉकडाऊनही जाहीर केला होता. देशांतर्गत प्रवासावरही निर्बंध लागू करण्यात आलं.

दरम्यान, कोरोनाच्या नवीन रूपानं, डेल्टा प्लस व्हेरियंटनं चिंता वाढवली आहे. डेल्टा प्लस हा व्हेरियंट अधिक संसर्गजन्य आहे. डेल्टा प्लस व्हेरियंटचा संसर्ग झालेल्यांना तीव्र खोकला, सर्दी होत आहे. पण सर्दीची लक्षणे मागील विषाणूपेक्षा अगदी वेगळी असल्याचं आढळली आहेत.

थोडक्यात बातम्या – 

मोठी बातमी! एअर इंडियाला खरेदी करण्यासाठी ‘या’ कंपनीने लावली बोली

टाइम मॅगझिनच्या 100 ‘सर्वात प्रभावशाली लोकांच्या’ यादीत मोदींसह या व्यक्तींचा समावेश

पुणे कोरोना अपडेट; जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

चिंताजनक! राज्यातील नव्या कोरोनाबाधितांचा आकडा वाढला, वाचा आकडेवारी

डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या प्रकरणात न्यायालयाने दिला ‘हा’ मोठा निकाल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More