बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Omicron किती धोकादायक?; आयसीएमआरने दिली ‘ही’ धक्कादायक माहिती

नवी दिल्ली | ओमिक्रॉन (B.1.1.529) व्हेरिएंटने जगाची चिंता वाढवली आहे. देशात ओमिक्रॉन व्हेरिएंटचे (Omicron variant) रूग्ण वाढत असून 12 राज्यात ओमिक्रॉनचे रूग्ण सापडले आहेत. त्यातच आयसीएमआरने(ICMR) सद्यस्थितीत ओमिक्रॉन धोकादायक नसल्याचं म्हटलं आहे.

भारतामध्ये ओमिक्रॉनचा प्रसार वाढत असला तरी आयसीएमआरचे अतिरिक्त महासंचालक डॉ. समीरन पांडा (Dr. Sameeran Panda) यांनी देशात होत असलेले कोरोना मृत्यू आणि नव्याने वाढणाऱ्या कोरोना केसवर ओमिक्रॉन रूग्णांची वाढ होण्याची शक्यता फार कमी आहे. पण डेल्टा व्हेरिएंटमुळे (Delta variant) देशातील प्रकरणे वाढत आहेत. तसेच ओमिक्रॉन व्हेरिएंटचा विदेशी प्रवासाने प्रसार वाढत असल्याने सर्व प्रवास मार्गांवर सतर्कतेने लक्ष ठेवण्यात येत आहे.

देशातील ओमिक्रॉन केसेसपैकी बहुतेक प्रकरण हे आंतराष्ट्रीय प्रवासाने वाढत असल्याचं निष्पन्न झालं आहे. काही अंशी संपुर्ण लसीकरण (Vaccination) देखील संसर्गाविरूद्ध प्रभावी ठरत नाही. त्यातच राज्यांनी महत्त्वाची भूमिका घेणं आवश्यक असल्याचं सांगण्यात येत आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंटची प्रकरणे वाढत असली तरी गंभीर संसर्गाचा ताण येण्याची शक्यता कमी आहे.

दरम्यान, डेल्टा व्हेरिएंटचा प्रसार वाढल्याने देशाला दुसऱ्या लाटेला सामोर जावं लागलं होतं. मोठ्या प्रमाणात बेड आणि ऑक्सिजनची कमतरता भासली होती. त्यातच आयसीएमआरकडून ओमिक्रॉन व्हेरिएंटपेक्षा डेल्टा व्हेरिएंट अधिक धोकादायक असल्याचं सांगण्यात येत आहे.

थोडक्यात बातम्या- 

“…त्याची ठाकरे सरकारला जराही शरम वाटली नाही”, चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल

ममतांचा जलवा कायम! भाजपला धूळ चारत पुन्हा गड राखला

नानांसह ‘या’ दोन नेत्यांना हायकमांडकडून समन्स, लगोलग दिल्लीला बोलावलं

मोठी बातमी! माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना मोठा झटका

‘…म्हणून मुलींच्या लग्नाचं वय 18 वरून 21 वर्ष केलं’; मोदींनी सांगितलं कारण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More