बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाच्या डेल्टा व्हेरिअंटचा ‘या’ वयोगटातील लोकांना अधिक धोका!

नवी दिल्ली | कोरोनाच्या डेल्टा व्हेरिअंटचा प्रत्येक वयोगटातील नागरिकांना संसर्ग होत असल्याचं दिसून आलं आहे. पण डेल्टा व्हेरिअंटचा संसर्ग 20 ते 30 वयोगटातील तरुण पीढीत अधिक असल्याचं दिसून येत आहे.

भारतासह संपूर्ण जगभरात डेल्टा व्हेरिअंट आणि त्याच्या म्यूटेट व्हेरिअंटवर अभ्यास करणाऱ्या इंग्लंडच्या पब्लिक हेल्थ संस्थेनुसार डेल्टा व्हेरिअंट प्रत्येक वयोगटात आढळून येत आहे. डेल्टा व्हेरिअंट सर्वात आधी महाराष्ट्रात आढळल्याचं सांगितलं जात आहे. डेल्टा व्हेरिअंटमुळेच देशात कोरोनाची दुसरी लाट आली आणि रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. डेल्टा व्हेरिअंटचा सामना करत असतानाच आता डेल्ट प्लस व्हेरिअंटनं धडक दिली आहे.

लहान मुलांपासून ते 80 वर्षांच्या वृद्ध व्यक्तींमध्येही डेल्टा व्हेरिअंट आढळून आला आहे. यात महिला आणि पुरूष रुग्ण यांचं प्रमाणही समसमान असल्याचं दिसून येत आहे. यात पुरूषांमध्ये डेल्टा व्हेअरिअंट आढळून येण्याचं प्रमाण जास्त आहे.

दरम्यान, देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत घट झाली आहे. विशेष म्हणजे गेल्या 81 दिवसात पहिल्यांदाच नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा 60 हजारांच्या खाली गेला आहे.

थोडक्यात बातम्या- 

“ठाकरे सरकारलाच कोरोनाची लागण, सरकार गेल्याशिवाय हा कोरोना बरा होणार नाही”

‘राष्ट्रवादी-शिवसेनेत वितुष्ट निर्माण होणार नाही’; सरनाईकांच्या लेटरबॉम्बनंतरही राष्ट्रवादीला विश्वास

सरनाईकांच्या लेटरबॉम्बवर राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

अजित पवारांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा…- गोपीचंद पडळकर

अनिल अंबानींना मोठा झटका; अडचणी वाढण्याची शक्यता

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More