Ratan Tata | भारताचे प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं 9 ऑक्टोबररोजी वयाच्या 86 व्या वर्षी निधन झालं. आज सायंकाळी 4:30 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. रतन टाटा यांच्यावर वरळीतील स्माशनभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनानंतर देशभरातून दुःख व्यक्त केलं जातंय. अशात रतन टाटा यांना भारतरत्न देण्याची मागणी करण्यात आली आहे. (Ratan Tata )
शिंदे सेनेच्या सोशल मीडियाचे राज्यप्रमुख राहुल कनाल यांनी रतन टाटांना भारतरत्न द्या, अशी मोठी मागणी केली आहे. त्यांनी या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र देखील लिहिलं आहे. रतन टाटा यांच्या उद्योग क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल भारतरत्न द्या, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे.
राहुल कनाल यांनी पत्रात नेमकं काय म्हटलंय?
भारतीय व्यवसाय क्षेत्रातील एक प्रतिष्ठित व्यक्ती रतन टाटा यांच्या निधनाप्रती मी दुःख व्यक्त करतो. त्यांचे कॉर्पोरेट क्षेत्रापलीकडे सामाजिक कार्यात मोठे योगदान होते. रतन टाटा हे केवळ दूरदृष्टी असलेले उद्योजकच नव्हे तर एक दयाळू व्यक्तीमत्त्वही होते. त्यांच्या पशूप्रेमाची सर्वांनाच कल्पना आहे. त्यांनी लाखो भटक्या श्वानांची मदत करत त्यांना नवं जीवन दिले होते. त्यासोबतच त्यांनी गरजूंसाठी कॅन्सर रुग्णालय उभारले. रतन टाटा यांनी समाजातील अनेक घटकांना निस्वार्थीपणाने मदत केली आहे. (Ratan Tata )
रतन टाटा यांनी फक्त उद्योग क्षेत्रातच नव्हे तर सामाजिक बांधिलकी जपत भरीव योगदान केले आहे. त्यांच्या या योगदानाच्या आधारावर भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान असलेला भारतरत्न पुरस्कारासाठी रतन टाटांच्या नावाची शिफारस करावी, अशी मागणी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे करत आहे. रतन टाटा यांना या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित केल्याने केवळ त्यांच्या वारसांचा सन्मान होणार नाही, त्यासोबतच असंख्य लोकांना त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून देशाच्या सामाजिक-आर्थिक परिस्थितीत सकारात्मक योगदान देण्यासाठीची प्रेरणा मिळेल. असं राहुल कनाल यांनी पत्रात म्हटलं आहे.
आज साडे चारवाजता टाटा यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाईल
दरम्यान, सकाळी 10 ते दुपारी 3:30 वाजेपर्यंत सर्वसामान्य लोकांना एनसीपीए या ठिकाणी टाटा यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेता येणार आहे. एनसीपीएच्या प्रवेशद्वार क्रमांक 3 मधून लोकांना अंत्यदर्शनासाठी प्रवेश दिला जाईल, तर प्रवेशद्वार क्रमांक 2 मधून नागरिकांना दर्शन घेऊन बाहेर पडता येईल. रतन टाटा यांच्यावर आज साडे चार वाजता अंत्यसंस्कार केले जातील. (Ratan Tata )
News Title : Demand for Bharat Ratna to Ratan Tata
महत्वाच्या बातम्या –
रतन टाटांचं बॉलिवूडशी खास नातं; मात्र झाले ‘इतक्या’ करोडोंचे नुकसान
‘या’ महिलांच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचा चौथा हप्ता जमा!
..म्हणून रतन टाटा यांनी कधीच लग्न केलं नाही; वाचा त्यांची LOVE Story
रतन टाटा यांची एकूण संपत्ती किती?, उत्पन्नातील मोठा हिस्सा दानमध्येच दिला