बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोव्हिड केअर सेंटरमध्ये महिला डाॅक्टरकडे केली शरीरसुखाची मागणी; आरोपीला अटक

नागपूर | कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येमुळे डाॅक्टर आणि परिचारिका दररोज लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर काही भागात डाॅक्टरांवर हल्ले होताना दिसत आहे. त्यातच आता डाॅक्टरी पेशाला काळिमा फासणारी घटना घडली आहे. नागपूरात एका पुरूष डाॅक्टरने महिला डाॅक्टरकडे शरीरसुखाची मागणी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

डॉ. नंदू रहांगडाले नावाच्या डाॅक्टरने एका महिला डाॅक्टरकडे शरीरसुखाची मागणी केली होती. या डॉक्टरने नागपूरच्या कोराडी मार्गावरील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये शारीरिक सुखाची मागणी करुन महिला डॉक्टरावर हॉस्पिटलमध्येच अत्याचाराचा प्रयत्न केला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. मानकापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे.

पीडित महिला डॉक्टर काही दिवसांपूर्वी मेडिकेअरमध्ये कामाला लागली. तेंव्हापासून डॉक्टर नंदू याची वाईट नजर महिला डॉक्टरवर होती आणि सोमवारी रात्री महिला डॉक्टर खोलीत होती. तेव्हा डॉ. नंदू  रहांगडाले हा तिच्या खोलीत आला आणि महिला डॉक्टरला शरीरसुखाची मागणी केली. महिला डॉक्टराने याला नकार दिला. त्यामुळे नंदू याने शिवीगाळ करून महिलेसोबत अश्लिल चाळे केले. तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. पण प्रसंगवधान राखत महिलेने त्याला धक्का दिला आणि पळ काढला होता.

दरम्यान, पीडित महिला डॉक्टरने तातडीने मानकापूर पोलीस स्टेशन गाठले आणि तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून नराधम डॉक्टराला अटक केलेली आहे. या प्रकरणी पोलीस आता अधिक तपास करत आहेत.

थोडक्यात बातम्या-

आसाम हादरले! 6.4 रेश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का

चिंता वाढली! देशात कोरोना मृ्तांची संख्या 2 लाख पार; रूग्णांसह मृत्युदरही वाढला

‘मोदीजी कृपया राजीनामा द्या…’; कंगणाचं ते ट्विट चर्चेत

‘ज्यांनी लस घेतली, त्यांनी मास्क लावायची गरज नाही’; ‘या’ देशाची मोठी घोषणा

केंद्र सरकार ‘या’ जिल्ह्यांमध्ये कडक लॉकडाऊन लावण्याच्या तयारीत; आरोग्य मंत्रालयाचा प्रस्ताव

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More